शिकारीचा पाठलाग करताना बिबट्या पाण्याच्या टाकीत पडला, वन विभागाचे दोन तास रेस्क्यू ऑपरेशन

शिकारीचा पाठलाग करताना बिबट्या पाण्याच्या टाकीत पडला, वन विभागाचे दोन तास रेस्क्यू ऑपरेशन

शिकारीचा पाठलाग करत असताना बिबट्या राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होमच्या पाठीमागील टाकीत पडला. ही घटना प्रत्यक्षदर्शी पाहणाऱ्या काही तरुणांनी याबाबत वन विभागाला माहिती दिली. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने तब्बल दोन तासांत रेस्क्यू ऑपरेशन करून जेरबंद केले.

राहुरी फॅक्टरी येथील सूर्यानगर, इंजिनियरिंग कॉलेज, गीते वस्ती व तनपुरे कारखाना परिसरात नेहमीच या बिबट्याचा वावर बघावयास मिळत होता. या बिबट्याने येथील अनेक शेळ्या, कोंबड्या फस्त केल्या होत्या व त्याचबरोबर येथील नागरिकांनाही अनेकवेळा दर्शन दिले होते.

आज दुपारी इंजिनीअरिंग कॉलेज परिसरात शिकारीचा पाठलाग करीत असताना पाण्याच्या टाकीमध्ये बिबट्या पडलेला दिसताच येथील तरुणांनी वन विभागास कळविले. त्यानंतर वन विभागाची रेस्क्यू टीम तसेच देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या अग्निशामक टीमला पाचारण केले.

पाण्याच्या टाकीत पडलेला बिबट्या दोन पाण्याच्या टाकींना जोडणाऱ्या पाईपमध्ये जाऊन बसला. वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन करत सदर बोगद्याच्या ठिकाणी पिंजरा लावला. त्यानंतर दोन तासांच्या परिश्रमानंतर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. हा बिबट्या तीन ते चार वर्षे वयाचा असल्याचा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

वनपरिक्षेत्र अधिकारी युवराज पाचारणे मार्गदर्शनाखाली गणेश मिसाळ, राजू रायकर, गणेश गिरी, एल. पी. शेंडगे, एस. बी. चव्हाण, एस. बी. खेमनर, एम. बी. ससे, मदन गाडेकर, राजू घुगे, ताराचंद गायकवाड, गोरख मोरे, प्रदीप कोहकडे, बाबासाहेब सिनारे, महादेव शेळके, कृष्णा पोपळघट, तसेच वन विभाग रेन स्टॉप विभाग, देवळाली प्रवरा नगरपालिका अग्निशमन विभागाचे बबन दिवे, सोमनाथ सूर्यवंशी, भाऊसाहेब बर्डे तसेच देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी परिश्रम घेतले. पकडलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;