उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना युवक काँग्रेसने दाखवले काळे झेंडे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना युवक काँग्रेसने दाखवले काळे झेंडे

जालना येथील मंठा चौफुली भागात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सायंकाळी सहा वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवले.

उपमुख्यमंत्री शिंदे आज जालना शहराच्या दौऱ्यावर आहेत. दत्त मंदिराकडून लोणीकर यांच्या निवासस्थानाकडे जात असताना मंठा चौफुली भागात काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध नोंदवला. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची मागणी काळे झेंडे दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांची आहे. लाडक्या बहिणींना निवडणुकीत 2100 रुपये देण्याची घोषणा करून लाडक्या बहिणींची सरकारने फसवणूक केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. शहरातील नागरी समस्यांचा तात्काळ निपटारा करावा तसेच मोती तलावात तथागत भगवान गौतम बुद्धांचा प्रलंबित पुतळा बसवण्यात यावा, या मागण्यांसाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला. यावेळी युवक काँग्रेसचे सचिव तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष शेषराव जाधव, दीपक गायकवाड, सूरज चक्रे, संतोष वाघमारे, सुखदेव उगले आदींची उपस्थिती होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;