धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड एकाच नाण्याच्या दोन बाजू, अंबादास दानवे यांचा हल्लाबोल

धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड एकाच नाण्याच्या दोन बाजू, अंबादास दानवे यांचा हल्लाबोल

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणी प्रकरणात अटक असलेल्या वाल्मीक कराडची मालमत्ता जप्त करण्याचा अर्ज एसआयटीकडून देण्यात आला आहे. मात्र ही घटना घडल्यानंतर वाल्मीक कराड अनेक दिवस फरार होता. या काळात त्याने आपल्या मालमत्ता हस्तांतरीत केल्या असाव्यात, त्यामुळे या सर्व प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी करण्यात यावी आणि मालमत्ता जप्तीसाठी ईडीनेच पुढाकार घ्यावा, असे स्पष्ट मत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले.

नांदेड येथे लोहा व नांदेड येथील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांच्या महत्वाच्या बैठकीसाठी ते आले असताना पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शिवसेना उपनेते तथा जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख बबनराव बारसे, जिल्हाप्रमुख भुजंग पाटील उपस्थित होते.

सरकार वाल्मीक कराडला पाठीशी घालत आहे. तो कुठे आहे याची माहिती मीडियाला मिळत होती, मग पोलिसांना का नाही? तो किती दिवस फरार होता? त्याला कुणी फरार केले? हे सगळे आता उघड झाले असून या काळात त्याने आपली संपत्ती, रोकड, मालमत्ता हस्तांतरीत केल्या असाव्या. सरकारनेही ईडीमार्फत चौकशी करून दूध का दूध, पाणी का पाणी केले पाहिजे, असे दानवे म्हणाले. धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशी आमची ठाम भूमिका आहे, असेही ते म्हणाले.

फायद्यात असलेली एसटी तोट्यात कशी गेली?

एसटी महामंडळाने केलेली भाडेवाढ ही संतापजनक असून, तीन महिन्यापूर्वीच एसटीच्या उपाध्यक्षांनी एसटी फायद्यात आहे, असे सांगितले होते. नागपूरच्या अधिवेशनात एसटी महामंडळाच्या टेंडर घोटाळ्यासंदर्भात आम्ही आवाज उठविला होता. त्याची चौकशी न करता फायद्यात असलेली एसटी तीन महिन्यात कशी काय तोट्यात गेली, असा सवाल दानवे यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;