Pune news – शालेय सहलीत शिक्षकच झाले ‘झिंगाट’

Pune news – शालेय सहलीत शिक्षकच झाले ‘झिंगाट’

इंदापूर तालुक्यातील भवानीनगर परिसरातील शालेय सहलीदरम्यान मद्यप्राशन करून शिक्षकच ‘झिंग झिंग झिंगाट’ झाल्याची घटना सहलीच्या प्रवासादरम्यान घडली. भवानीनगर परिसरातील नामांकित शाळेच्या शिक्षकांचा हा ‘प्रताप’ आहे. यामुळे परिसरातील पालकवर्गातून या शिक्षकांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

ही सहल सोमवारी (20 रोजी) पहाटे कोल्हापूर, पावनखिंड, रत्नागिरी, चाफळमधील राममंदिर, चिपळूणकडे रवाना झाली. यामध्ये एसटी आगाराच्या दोन बसेसचा समावेश होता. तसेच या शाळेतील सर्व शिक्षक व 80 शालेय विद्यार्थी गेले होते. मात्र, या प्रवासादरम्यान एका हॉटेलच्या ठिकाणी दोन्ही बसेस थांबल्या होत्या. सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये उतरल्यानंतर शिक्षकही त्यांच्याबरोबर उतरले.

विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचे जेवण आटोपल्यानंतर त्याच हॉटेलमध्ये दुसऱ्या ठिकाणी सर्व शिक्षक जेवणासाठी बसले होते. त्यांनी मद्यप्राशन केल्यामुळे जेवणानंतर बिल कोण भरणार? यावरून वादावादी सुरू झाली. ‘झिंगाट’ झालेल्या शिक्षकांच्या धिंगाण्यामुळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी भयभीत झाले. मात्र, या सर्व प्रकारामुळे सहलीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;