शाहरूखपेक्षाही जास्त फॉलोअर्स, 21 व्या वर्षी मुंबईत करोडोंचे घर, 250 कोटींची संपत्ती; या अभिनेत्रीने सेलिब्रिटी किड्सलाही मागे टाकलं

शाहरूखपेक्षाही जास्त फॉलोअर्स, 21 व्या वर्षी मुंबईत करोडोंचे घर, 250 कोटींची संपत्ती; या अभिनेत्रीने सेलिब्रिटी किड्सलाही मागे टाकलं

बॉलिवूडमध्ये प्रत्येक कलाकाराचे प्रचंड फॅन्स आहेत. त्यात आता सेलिब्रिटी किड्सचाही समावेश होत आहे. सेलिब्रिटींच्या मुलांचाही आता फॅन फॉलोइंग होऊ लागली आहे. पण अशी एक अभीनेत्री आहे दिने चक्क 21 व्या वर्षी स्वत:च्या हिंमतीवर अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवला.

अवघ्या 21 व्या वर्षी मुंबईत स्वत:चं करोडोंचं घर

आता सेलिब्रिटी किड्स किंवा या इंडस्ट्रीत येणारे नवीन चेहेर शक्यतो 22 ते 23 वर्षांच्या पुढेच अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवतात पण अशी एक अभिनेत्री आहे जिने खूप लहान वयात या क्षेत्रात पाऊल टाकलं आणि चक्क एवढं कमावल की तिने अवघ्या 21 व्या वर्षी मुंबईत करोडोंचं घर घेतलं आहे. एवढच नाही तर तिचे मिलियनने फॉलोअर्स आहेत. ही अभिनेत्री आहे जन्नत जुबेर.

जन्नत सोशल मीडिया क्वीन तर आहेच पण सोबतच टी.व्ही मालिकांमध्येही तिने काम केल आहे. जन्नत अवघ्या 23 वर्षाच्या वयात अभिनय कार्यक्षेत्रात अधिक प्रसिद्धी मिळवली. चाहतावर्ग, सुंदरता आणि नेट वर्थच्याबाबतीत या अभिनेत्रीने कित्येक लोकप्रिय अभिनेत्रींना मागे टाकलं आहे.

अभिनेत्रीचे इन्टावर मिलियनने फॉलोअर्स 

टी.व्ही क्षेत्रातील अधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये तिचं नाव घेतलं जातं. अनेक टी.व्ही शोमध्ये या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाचा ठसा तर उमटवलाच आहे पण यासोबतच अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये सुद्धा तीचा सहभाग राहिला आहे. जन्नतचा सोशल मिडीयावर खूप मोठा चाहतावर्ग तयार केला आहे.

जन्नत फक्त टी.व्ही शोमधील अभिनेत्री असण्याव्यातिरिक्त सोशल मिडीया इन्फ्लूएंसर म्हणून सुद्धा तिला ओळखले जाते. कमी वयात प्रचंड लोकप्रिय आणि सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग असलेली जन्नत जुबेर आता 23 वर्षीय अभिनेत्री आहे.

फॉलोअर्सच्या बाबतीतही बॉलिवूडचा बादशाह शाहरुखला मागे टाकलं 

जन्नत जुबेरनं फॉलोअर्सच्या बाबतीतही बॉलिवूडचा बादशाह शाहरुखला मागे टाकलं आहे. शाहरूखचे इंस्टाग्रामवर 46 मिलिअनहून अधिक फॉलोअर्स आहेत. परंतु, जन्नत जुबेरचे इन्स्टाग्रामवर 49.7 मिलियन फॉलोअर्स आहेत जे शाहरुखच्या फॅन फॉलोअर्सपेक्षा कितीतरी जास्त आहेत.

जन्नतचा जन्म 29 ऑगस्ट 2001 ला मुंबई मध्ये झाला. टी.व्ही शो मध्ये बालकलाकार म्हणून तिने आपल्या करिअरला सुरुवात केली. 2008 मधील ‘चांद के पार चलो’ हा तिचा पहिला टी.व्ही शो होता. यानंतर ‘दिल मिल गए’, ‘काशी: अब ना रहे तेरा कागज कोरा’, ‘फुलवा’, ‘महाराणा प्रताप’, ‘तू आशिकी’, ‘फियर फाइल्स’ अशा अनेक टी.व्ही शोमध्ये झळकली आहे. तसेच, राणी मुखर्जीच्या ‘हिचकी’ या चित्रपटात सुद्धा जन्नतने काम केलं आहे.

जन्नतने अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये सुद्धा काम केलं आहे

जन्नतने अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये सुद्धा काम केलं आहे. ‘फियर फॅक्टर खतरों के खिलाडी 12’ आणि ‘लाफ्टर शेफ’ या शोमध्ये ती झळकली. ‘खतरों के खिलाडी’ या शोमधील जन्नत ही सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक होती. प्रत्येक एपिसोडसाठी तिने 18 लाख रुपये घेतले. तसेच, ‘लाफ्टर शेफ’च्या प्रत्येक एपिसोडसाठी तिने 2 लाख रुपये इतके मानधन घेतले. ती प्रत्येक पोस्टसाठी दीड ते दोन लाख रुपये मानधन घेते.

जन्नत जुबेर रहमानी हे जन्नतचे पूर्ण नाव आहे. जन्नतने केवळ 21व्या वर्षी मुंबईमध्ये आपलं स्वत:चं घर विकत घेतलं. जन्नत एक अभिनेत्रीच नाही तर एक बिझनेसवुमन देखील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जन्नतची एकूण संपत्ती 250 कोटी रुपये इतकी आहे, त्यामुळे जन्नत बॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाही.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;