उपकरप्राप्त इमारतीच्या रहिवाशांना दिलासा; विकासकांनी रखडवलेले पाच प्रकल्प म्हाडा पूर्ण करणार

उपकरप्राप्त इमारतीच्या रहिवाशांना दिलासा; विकासकांनी रखडवलेले पाच प्रकल्प म्हाडा पूर्ण करणार

उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास रखडवणाऱ्या विकासकांना म्हाडाने दणका दिला आहे. विकासकांनी रखडवलेले पाच प्रकल्प म्हाडाने ताब्यात घेतले असून आता नवीन विकासक नेमून ते प्रकल्प आता म्हाडाच पूर्ण करणार आहे. त्या बदल्यात म्हाडाला येथे मोठय़ा प्रमाणात गृहसाठा उपलब्ध होणार असून भविष्यात मास्टर लिस्टवरील भाडेकरूंसाठी ही घरे उपलब्ध होऊ शकणार आहेत.

उपकरप्राप्त इमारत धोकादायक झाल्यानंतर त्याचा पुनर्विकासासाठी संबंधित इमारत मालकाने म्हाडाकडून नोटीस आल्यानंतर सहा महिन्यांत पुनर्विकास प्रस्ताव दाखल करणे बंधनकारक आहे. त्यानुसार म्हाडाने पुनर्विकासासाठी एनओसी दिल्यानंतर मालकाकडून विकासक निश्चित केला जातो. अनेक विकासकांनी आर्थिक अडचण किंवा वेगवेगळय़ा कारणांनी पुनर्विकास प्रकल्प रखडवले आहेत. याचा फटका रहिवाशांना बसतो. या पार्श्वभूमीवर एनओसी देऊनही प्रकल्प पूर्ण न करणाऱ्या  विकासकांकडून म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने म्हाडा अधिनियमातील नवीन कलम 91 अ नुसार पाच पुनर्विकास प्रकल्प काढून घेतले आहेत. म्हाडा आता स्वतःच्या अधिकारात हे प्रकल्प पूर्ण करणार आहे, अशी माहिती मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. म्हाडाने ताब्यात घेतलेल्या पाच इमारतींपैकी दोन इमारती जी नॉर्थ विभागात तर तीन प्रकल्प एफ साऊथ विभागात आहेत. सद्यस्थितीत यातील काही जुन्या इमारती तोडण्यात आल्या आहेत, तर काही इमारतींचे काम विविध मजल्यांपर्यंत पोहचून अर्धवट बंद पडले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;