जगभरात इंग्रजी बोलणाऱ्या पहिल्या 5 देशांमध्ये हिंदुस्थानला स्थान; चीनमध्ये फक्त 0.9 टक्के इंग्रजीत संभाषण

जगभरात इंग्रजी बोलणाऱ्या पहिल्या 5 देशांमध्ये हिंदुस्थानला स्थान; चीनमध्ये फक्त 0.9 टक्के इंग्रजीत संभाषण

इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा मानली जात आहे. मात्र, जगभरात किती देशांमध्ये अस्खलीत इंग्रजी बोलण्यात येते, याबाबत सर्वे करण्यात आला आहे. अस्खलीत इंग्रजी बोलणाऱ्या पहिल्या 5 देशांमध्ये हिंदुस्थानला स्थान मिळाले आहे. तसेच जगभरात इंग्रजीचा बोलाबाला असला तरी अनेक देशांमध्ये राष्ट्रीय भाषेला प्राधान्य देण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. ब्रिटनमध्ये सर्वाधीक संभाषण इंग्रजी भाषेत होते. तर चीनमध्ये सर्वात कमी म्हणजे फक्त 0.9 टक्के संभाषण इंग्रजीमध्ये होत असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे.

देशात महानगरांमध्ये इंग्रजी बोलण्याचं प्रमाण वाढलं आहे, कॉर्पोरेट कंपन्यांमध्येही इंग्रजीत संभाषण महत्त्वाचे असते. तसेच देशात इंग्रजी माध्यमांच्या शाळांचेही प्रमाण वाढले आहे. लहानपणापासूनच आपल्या मुलांना स्पष्ट आणि अस्खलीत इंग्रजी बोलता यावं अशी पालकांनी इच्छा असते. त्यामुळे, इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पाल्यांना पाठवण्यात येत असल्याचे दिसते. अनेकदा विदेशवारीसाठी इंग्रजी सक्तीची असल्याचं सांगण्यात येतं. मात्र, एका अहवालानुसार देशाबाहेर किती देशांमध्ये इंग्रजीत संवाद साधला जातो, किंवा इंग्रजी बोलण्यात कोणता देश आघाडीवर, पिछाडीवर आहे याबाबत सर्वेक्षण करण्यात आले, त्याचा अहवाल नुकताच आला आहे.

सध्या अनेक देशांमध्ये इंग्रजीला अधिक महत्त्व न देता त्यांच्या राष्ट्रीय भाषेतच व्यवहार व अभ्यासक्रम होत आहे. देशातही हिंदी, संस्कृतनंतर सर्वाधिक इंग्रजीत संभाषण होत आहे. हिंदुस्थान इंग्रजी भाषा बोलण्यात जागतिक सरासरीपेक्षा पुढे आहे. देशात सर्वाधिक इंग्रजी बोलले जाणारे शहर हे दिल्ली आहे. दिल्लीनंतर राजस्थान आणि पंजाबमध्ये सर्वाधिक इंग्रजी बोललं जाते. पियरसनच्या ग्लोबल इंग्लिश प्रोफिसिएंसी अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे.

इंग्रजी बोलणाऱ्या जगभरातील देशांमध्ये ब्रिटन म्हणजे इंग्लंडमध्ये 98.3 टक्के लोकं आहेत. तर, अमेरिकेत 95 टक्के नागरिक इंग्रजीत संवाद साधतात. वर्ल्‍ड ऑफ स्‍टॅट‍िक्‍सच्या डेटानुसार सर्वाधिक इंग्रजी जिब्राल्‍टर लोकं बोलतात. येथील 100 टक्के नागरिक इंग्रजी बोलतात. लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केल्यास भारत इंग्रजी बोलणाऱ्या प्रमुख 5 देशांमध्ये आहे.

चीनमध्ये सर्वात कमी इंग्रजी भाषा बोलली जाते. चीनमध्ये केवळ 0.9 टक्के लोक इंग्रजी बोलतात. येथील नागरिक चीनी भाषेचा सर्वाधिक वापर करतात. चीनमध्ये चीनी, मंगोलियाई, तिब्बती, उइघुर आणि झुआंग भाषा जास्त प्रमाणात बोलल्या जातात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;