मुंबई विद्यापीठाच्या समस्यांबाबत शासन दरबारी पाठपुरावा करणार; अंबादास दानवे यांचे आश्वासन

मुंबई विद्यापीठाच्या समस्यांबाबत शासन दरबारी पाठपुरावा करणार; अंबादास दानवे यांचे आश्वासन

मुंबई विद्यापीठातील शिक्षकांची रिक्त पदे, महाविद्यालयांचा नामांकनाचा विषय, एमएमआरडीएकडून विद्यापीठ परिसरात रखडलेली विकासकामे आदी मुंबई विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांच्या समस्या शासन दरबारी मांडणार आहोत. तसेच त्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिले आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथे बुधवारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सिनेट सदस्यांसोबत भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

कलिना कॅम्पस येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी उभारण्यात येणाऱ्या इमारती, परिसराचे सुशोभिकरण आदी कामांसाठी मुंबई विद्यापीठ आणि एमएमआरडीएमध्ये करार झाला होता. मात्र ही कामे रखडली असून ती कधी पूर्ण होणार याची माहिती त्यांनी घेतली. कलिना कॅम्पस येथे दररोज 5 ते 6 हजार विद्यार्थी विविध शैक्षणिक कामासाठी येतात. त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. तसेच या परिसरात बाहेरून येणाऱ्या समाजकंटकाकडून मुलींची छेड काढण्याचे तसेच अत्याचाराच्या घटना घडतात. असे असताना कलिना कॅम्पसच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील बिट चौकी रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली पाडण्यात आली. त्यामुळे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, असे सिनेट सदस्य शीतल देवरूखकर-शेठ यांनी सांगितले.

शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र, विद्यापीठातील शिक्षक भरती रद्द करण्यात आल्याच्या प्रश्नाकडे सिनेट सदस्य मिलिंद साटम यांनी लक्ष वेधले. मुंबई विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय नामांकनाचा दर्जा प्राप्त झाला असताना विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या असुविधेकडे होत असलेले दुर्लक्ष ही खेदजनक बाब आहे. देशातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थी तसेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थी शिक्षणासाठी विद्यापीठात येत असतात. त्यामुळे येथील असुविधेबाबत शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.

यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, प्रकुलगुरू अजय भामरे, स्थानिक आमदार विलास पोतनीस,डॉ. नंदकिशोर मोतेवार, विभाग प्रमुख डॉ. महेश पेडणेकर, सिनेट सदस्य शीतल देवरूखकर – शेठ , मिलिंद साटम, किसन सावंत, अल्पेश भोईर, परम यादव, डॉ.धनराज कोहचाडे आदी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;