सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीच्या आईचं मोठं वक्तव्य, आरोपीकडून पोलिसांनी जप्त केल्यात ‘या’ गोष्टी

सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीच्या आईचं मोठं वक्तव्य, आरोपीकडून पोलिसांनी जप्त केल्यात ‘या’ गोष्टी

Saif Ali Khan Case: सैफ अली खान (Saif Ali Khan) याला लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे कुटुंबियांनी मोकळा श्वास घेतला आहे. आता सैफ अली खान याच्या प्रकरणात मध्यरात्री मोठे बदल झाली आहेत. सैफ हल्ला प्रकरणातील तपास अधिकारी यांची बदली करण्यात आली आहे. सैफ याच्या प्रकरणाची जबाबदारी पीआय अधिकारी सुदर्शन गायकवाड यांच्याकडे होती, पण आता अभिनेत्याच्या प्रकरणाचा तपास अजय लिंगानुरकर करणार आहेत. मात्र, मध्यरात्री जुन्या तपास अधिकाऱ्यांच्या बदलीचा निर्णय का घेण्यात आला? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

आरोपीचं बंगाल कनेक्शन?

सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा आरोपी पश्चिम बंगाल येथील असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल फोनमध्ये अनेक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी सांगितल्यानुसार, आरोपीचा सीम कार्ड जप्त करण्यात आला आहे. सीम कार्ड कोलकाता, पश्चिम बंगाल येथील रहिवासी असलेल्या खुकुमोनी जहांगीर शेख नावाच्या व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत होते. हे सिम कार्ड 23 मार्च 2024 रोजी सक्रिय करण्यात आले. आरोपीच्या मोबाईलमधून काही महत्त्वाची कागदपत्रे देखील जप्त करण्यात आली आहेत… अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.

आरोपीला 5 दिवसांची पोलीस कस्टडी

सैफवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला मुंबई पोलिसांनी नुकतेच अटक करून न्यायालयात हजर केलं होतं. तेव्हा न्यायालयाने आरोपीला 5 दिवसांची कोठडी सुनावली. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी 35 हून अधिक पथके तयार केली होती.

काय म्हणाली आरोपीची आई?

हल्ल्याचा आरोपी शहजादकडून घटनेच्या वेळी घातलेले कपडे आणि इअरफोन जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी कपडे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत. पोलिसांनी शहजादच्या फोनवरुन त्याच्या आई – वडिलांना फोन केला होता. तेव्हा माझा मुलगा आरोपी आहे… असं आरोपीच्या आईने सांगितलं. आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;