संविधान निर्मितीत ब्राह्मणांचंही महत्त्वपूर्ण योगदान, डॉ. आंबेडकरांच्या वक्तव्याचा दाखला देत हायकोर्टाच्या न्यायमूर्तींचं विधान

संविधान निर्मितीत ब्राह्मणांचंही महत्त्वपूर्ण योगदान, डॉ. आंबेडकरांच्या वक्तव्याचा दाखला देत हायकोर्टाच्या न्यायमूर्तींचं विधान

संविधान निर्मितीमध्ये ब्राह्मणांचेही महत्त्वपूर्ण योगदान आहे. संविधान मसुदा समितीच्या 7 सदस्यांपैकी 3 जण ब्राह्मण होते, असे विधान कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्णा एस. दीक्षित यांनी केले आहे. अखिल कर्नाटक ब्राह्मण महासभेच्या सुवर्णजयंतीनिमित्त आयोजित संमेलनात ते बोलत होते.

संविधान निर्माते डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी भांडरकर संस्थेत म्हटले होते की, बी.एन. राव यांनी संविधानाचा मसुदा तयार केला नसता तर तो तयार होण्याआधी आणखी 25 वर्ष लागली असती, अशी आठवणही यावेळी Justice Krishna S Dixit यांनी सांगितली.

संविधान मसुदा समितीतील 7 सदस्यांपैकी अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अयंगार आणि बी.एन. राव हे तिघे ब्राह्मण होते. ब्राह्मण हा शब्द जातीशी न जोडता वर्णाशी जोडला पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले. ‘डेक्कन हेराल्ड‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

वेदांची रचना करणारे वेद व्यास हे मच्छीमाराचे पुत्र होते आणि रामायण लिहिणारे महर्षि वाल्मिकी हे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचे होते. ब्राह्मणांनी कधी त्यांच्याकडे तुच्छतेने पाहिले का? आपण शतकानुशतके प्रभू श्रीरामाची पूजा करत आलो असून त्यांची मुल्ये राज्यघटनेमध्येही समाविष्ट केलेली आहेत, असेही न्यायमूर्ती दीक्षित म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;