ईडीला सुप्रीम कोर्टाचा दणका, भुजबळांच्या जामिनाला दिलेले आव्हान फेटाळले

ईडीला सुप्रीम कोर्टाचा दणका, भुजबळांच्या जामिनाला दिलेले आव्हान फेटाळले

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. महाराष्ट्र सदन घोटाळय़ाशी संबंधित आर्थिक अफरातफर प्रकरणात 2018 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने भुजबळ यांना जामीन मंजूर केला होता. त्या जामीनाला आव्हान देणारी अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) याचिका न्यायालयाने फेटाळली. या निर्णयामुळे ईडीला चांगलाच झटका बसला आहे.

न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. ईडीने छगन भुजबळ यांच्यासह पुतण्या समीर भुजबळ यांचा जामीन रद्द करण्याची विनंती याचिकेतून केली होती. भुजबळ काका-पुतण्याला जामीन देण्याचा आदेश 2018 मध्येच जारी केला होता. त्यामुळे या टप्प्यावर संविधानाच्या अनुच्छेद 136 अन्वये जामीनाच्या आदेशात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता वाटत नाही. याच पार्श्वभूमीवर ईडीची याचिका फेटाळत आहे, असे न्यायमूर्ती ओक यांच्या खंडपीठाने आदेशात नमूद केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;