देशभरातील महत्त्वाच्या काही बातम्या

देशभरातील महत्त्वाच्या काही बातम्या

व्हॉट्सअॅप देणार इन्स्टाग्रामचा ‘फील’

व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी एक भन्नाट फिचर घेऊन येतंय. व्हॉट्सअॅपवर इन्स्टाग्रामसारखे फिचर मिळणार आहे. लवकरच युजर्सना स्टेटस अपडेटमध्ये म्युझिक अॅड करण्याचा पर्याय मिळणार आहे. अगदी गाणेदेखील जोडता येईल. त्यामुळे युजर्सला इन्स्टाग्रामसारखा फील येईल. सध्या अँड्रॉईड युजर्ससाठी या फिचरची चाचणी सुरू आहे. लवकरच हे फिचर रोल आऊट होणार आहे. डब्ल्यूएबीटा इन्पह्च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप आता स्टेटस अपडेटसाठी म्युझिक फिचर आणू शकते. असं मानलं जातंय की, इन्स्टाग्रामसारखी म्युझिक लायब्ररी व्हॉट्सअॅपवर उपलब्ध करून देऊ शकते.

बिहारी बाबूच्या प्रेमात पडली अमेरिकन मॅडम

विदेशी तरुणीला देशी नवरदेव आवडला आणि ती चक्क विवाहासाठी हिंदुस्थानात पोचली. बिहारच्या छपरा येथे हा विशेष लग्नसोहळा रंगला. नवरदेव आणि अमेरिकन वधू या लग्नसोहळ्याला अमेरिकन वऱहाडी मंडळी घेऊन आली आणि एका लग्नाची चर्चा रंगली. 33 वर्षीय आनंद कुमार सिंह यांचा अमेरिकेत हॉटेल व्यवसाय आहे. त्या दरम्यान त्यांची साफिया सेंगर हिच्याशी भेट झाली. एकमेकांना समजून घेतल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. 16 जानेवारी रोजी साफिया अमेरिकन मित्रांसोबत चंदउपुर गावात पोचली. 20 जानेवारी रोजी आनंद आणि साफिया दोघांनी हिंदू परंपरेने लग्न केले.

मोनालिसा भोसलेचे इन्स्टा फॉलोअर्स वाढले

महाकुंभमेळामध्ये रुद्राक्ष माळा विकणारी मोनालिसा भोसले ही तरुणी आपल्या नैसर्गिक सौंदर्यामुळे रातोरात प्रसिद्ध झाली आहे. देशभर प्रसिद्ध झाल्यानंतर तिचे इन्स्टाग्राम अकाऊंटवरील फॉलोअर्स अवघ्या आठवडय़ाभरात 1 लाख 70 हजारांवर पोहोचले आहे. महाकुंभमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर तिचे नाव अनेक जण गुगलवर सर्च करत आहेत. मोनालिसाच्या नावाने सोशल मीडियावर अनेक फेक अकाऊंटसुद्धा तयार झाले आहेत, परंतु तिचे ओरिजनल अकाऊंट @monibhasale8 आहे, असे तिच्या भावाने स्पष्ट केले आहे. महाकुंभमधील तिचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;