कांजूर मेट्रो कारशेड परिसरात सापडलेल्या ‘त्या’ व्यक्तीची हत्याच
रविवारी कांजूरमार्ग मेट्रो कारशेड परिसरात मृतावस्थेत सापडलेल्या 42 वर्षीय व्यक्तीची डोक्यात मारहाण करून हत्या केल्याचे समोर आले आहे. वैद्यकीय अहवालातून ही बाब समोर आली असून पोलिसांनी त्यानुसार हत्येचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.
राजेश सारवण (42) असे त्या मृत व्यक्तीचे नाव होते. तो चकाला रोड परिसरात राहत होता. रविवारी कांजूरमार्ग मेट्रो कारशेड परिसरात राजेशचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली होती. शवविच्छेदन अहवालात मृतकाच्या डोक्यावर टणक वस्तूने मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List