सैफ अली खानला पूर्ण बरा होण्यासाठी किती दिवस, महिने लागतील?, हेल्थ अपडेट काय?; डॉक्टर लागले ‘या’ कामाला

सैफ अली खानला पूर्ण बरा होण्यासाठी किती दिवस, महिने लागतील?, हेल्थ अपडेट काय?; डॉक्टर लागले ‘या’ कामाला

Saif Ali Khan Health Update: अभिनेता सैफ अली खान याच्या प्राणघातक हल्ला झाल्यानंतर अभिनेत्याला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 16 जानेवारी रोजी अभिनेत्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. आता अभिनेत्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देखील समोर आली आहे. पण अभिनेत्याला डॉक्टरांनी काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. शिवाय डॉक्टर देखील त्याच्यासाठी महत्त्वाच्या कामाला लागले आहेत.

डॉक्टरांच्या टीमने सैफ अली खानला घरी घेऊन जाण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, सैफला घरी कधी घेवून जायचं हा निर्णय अभिनेत्याचे कुटुंबिय घेणार आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफ आता चालू शकतो, बोलू शकतो, पण पूर्ण बरे होण्यासाठी एक महिना लागेल. म्हणजे डॉक्टरांनी सांगितल्यानुसार अभिनेत्याला पूर्णपणे बरं होण्यासाठी 1 महिना लागणार आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

पाठीवर झालेल्या प्लास्टिक सर्जरीनंतर सैफला पूर्णपणे बरं होण्यासाठी एक महिना लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. डॉक्टरांनी सैफला पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला दिला असून जड वस्तू उचलणे, व्यायाम करणे आणि शूटिंग करणे टाळन्याचा सल्ला दिला आहे. तर औषधांचे वेळापत्रक लिलावती हॉस्पिटलमध्ये तयार केले जात आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्याला लवकरच डिस्चार्ज मिळेल. पण अभिनेता काही दिवस चालू फिरू शकणार नाही. सैफच्या जखमा अद्याप बऱ्या झालेल्या नाहीत, त्यामुळे अभिनेत्याला त्याच्या कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त इतर लोकांना भेटण्यास मनाई करण्यात आली आहे, कारण जखमा बऱ्या झाल्या नाहीत तर संसर्गाचा धोका असू शकतो.

हल्ल्यानंतर घेण्यात आले मोठे निर्णय

अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर त्याच्या सोसायटीच्या बाल्कनीत सध्या जाळी बसवण्याचे काम सुरू आहे. हल्ल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सुरक्षेसाठी बाल्कनीत जाळी बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एढंच नाही तर, मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खानच्या सोसायटीचे सुरक्षा रक्षक देखील बदलले जाऊ शकतात, ज्या एजन्सीकडे सुरक्षा रक्षकांचा करार होता तो रद्द करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;