Mumbai News – पवईत तानसा जलवाहिनीला मोठी गळती, दुरुस्तीमुळे अनेक भागातील पाणीपुरवठा तत्काळ बंद

Mumbai News – पवईत तानसा जलवाहिनीला मोठी गळती, दुरुस्तीमुळे अनेक भागातील पाणीपुरवठा तत्काळ बंद

मुंबई महापालिकेच्या तानसा जलवाहिनीला मंगळवारी पहाटे पवई येथील जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्‍त्‍यावरील पुलाजवळ मोठी गळती लागली. त्यामुळे तानसा जलवाहिनीचा पाणीपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला आहे. तसेच जलवाहिनी दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे.

दरम्यान, जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पवई ते धारावी दरम्‍यानची जलवाहिनी बंद करण्यात आली आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी 24 तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे एस विभाग, के पूर्व विभाग, जी उत्‍तर विभाग आणि एच पूर्व विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे जलवाहिनी दुरूस्‍ती कालावधीत नागरिकांनी पाणी जपून व काटकसरेने वापरावे, महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे प्रशासनाच्‍या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्या भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद –

एस विभाग- गौतमनगर निम्न पातळी, जयभीम नगर, बेस्ट नगर, फिल्टर पाडा, गावदेवी, पठाणवाडी, महात्मा फुले नगर, मुरारजी नगर, आरे रस्‍ता, मिलिंद नगर, एल ऍण्ड टी परिसर

के पूर्व विभाग – ओम नगर, साहारगाव, जे. बी. नगर, लेलेवाडी, मरोळ जलवाहिनी, कदमवाडी, शिवाजी नगर, सेव्हन हिल्स रूग्‍णालय परिसर, चिमटपाडा, टाकपाडा, सागबाग, तरुण भारत, चकाला, कबीर नगर, बामणवाडा, महाराष्‍ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसर

जी उत्तर – धारावी

एच पूर्व – बेहरामपाडा, वांद्रे रेल्वे टर्मिनस

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;