सुशांतच्या पाठीवर असलेला टॅटू होता अत्यंत खास, कोणासाठी अभिनेत्याने काढलेला टॅटू?

सुशांतच्या पाठीवर असलेला टॅटू होता अत्यंत खास, कोणासाठी अभिनेत्याने काढलेला टॅटू?

Sushant Singh Rajput: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आज आपल्यात नसला तरी अभिनेत्याबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. सोशल मीडिावर देखील सुशांतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. आज सुशांत याचा जन्मदिन आहे. त्यामुळे अभिनेत्याबद्दल अनेक खास गोष्टी समोर येत आहेत. सांगायचं झालं तर, सुशांत त्याच्या सिनेमांमुळे तर चर्चेत होताच पण अभिनेत्याचं खासगी आयुष्य देखील चर्चेत राहिलं.

सुशांतच्या आयुष्यात एक खास व्यक्ती होती आणि त्या व्यक्तीसाठी अभिनेत्याने पाठीवर टॅटू देखील काढला होता. शिवाय अभिनेत्याने टॅटूचं महत्त्व देखील सांगितलं होतं. सुशांत याने पाठीवर दुसऱ्या तिसऱ्या कोणासाठी नाही तर, स्वतःच्या आईसाठी टॅटू काढला होता.

सुशांत याने लहान असतानाच आईला गमावलं होतं. अभिनेत्याचं आईवर प्रचंड प्रेम होतं. म्हणून अभिनेत्याने पाठीवर आईसाठी टॅटू काढला होता. टॅटू बनवण्यासाठी अभिनेत्याला बहीण श्वेता सिंह हिने मदत केली होती. सुशांत याला टॅटू मानेवर हवा होता. पण त्यानंतर पाठीवर अभिनेत्याने आईसाठी टॅटू काढला. सुशांतला असा टॅटू हवा होता जो त्याच्या आणि त्याच्या आईच्या नात्याला जवळून प्रतिबिंबित करेल.

काय होतं सुशांतच्या पाठीवर असलेल्या टॅटूचं महत्त्व?

सुशांतने स्वत: त्याच्या टॅटूबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केलं होतं. टॅटूमध्ये एक त्रिकोणी वर्तुळ आहे आणि त्याच्या आत दुसरा त्रिकोण आहे. त्यामध्ये आई आणि तिच्या पोटात वाढणारे मूल यांचं चित्र आहे. टॅटूबद्दल सुशांत म्हणाला होता, ‘या टॅटूमध्ये पाच घटक आहेत, आई आणि मी. तुम्ही हा टॅटू नीट पाहिल्यास, तुम्हाला त्रिकोणाच्या मध्यभागी एक लहान मूल आणि आई देखील दिसेल.’ सुशांत कायम आईच्या आठवणीत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करायचा.

सुशांत सिंह राजपूत याचा मृत्यू?

14 जून 2020 रोजी सुशांत याने वांद्रे येथील राहत्या घरी स्वतःला संपवलं. अभिनेत्याच्या मृत्यूनंतर सर्वत्र खळबळ माजली होती. सुशांत याच्या निधनानंतर चाहत्यांसह बॉलिवूडला देखील मोठा धक्का बसला होता. सुशांत याच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींची चौकशी देखील करण्यात आली. पण सुशांत याने इतक्या टोकाचं पाऊल का उचलला? हे अद्यापही रहस्य आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;