IPL 2025 ऋषभ पंत लखनौ सुपर जायंट्सचा नवा कर्णधार

IPL 2025 ऋषभ पंत लखनौ सुपर जायंट्सचा नवा कर्णधार

आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेची रणधुमाळी 21 मार्चपासून सुरू होत आहे. या स्पर्धेच्या पूर्वतयारीचे नगारे आता वाजायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर लखनौ सुपर जायंट्सने सोमवारी ऋषभ पंतची आपल्या संघाचा नवा कर्णधार म्हणून घोषणा केली.

लखनौ संघाचे मालक संजीव गोयंका यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘ऋषभ पंत हा लखनौ संघाचा भविष्यातील कर्णधार आहे. त्याला लिलावात संघाला सामील केलं तेव्हाच हा निर्णय घेण्यात आला होता; पण आम्ही एकत्र येऊन ही घोषणा करण्यासाठी थांबलो होतो. मला वाटतं, तो केवळ आयपीएलमधला सर्वात महागडा खेळाडू नाही, तर आयपीएलमधला सर्वोत्कृष्ट खेळाडूही आहे हे काळ सिद्ध करेल. एलएसजीचा नवा कर्णधार म्हणून निवड झाल्यानंतर पंत म्हणाला, ‘आश्चर्यकारक! सरांनी माझ्याबद्दल जे काही म्हटलं ते ऐकून मी भारावून गेलो आहे.’’ लखनौ सुपर जायंट्सने ऋषभ पंतला 27 कोटी रुपयांना लिलावात खरेदी केले, जी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडी बोली होती. ऋषभ पंतने यापूर्वी दिल्ली पॅपिटल्सचे नेतृत्व केले होते. लखनौ सुपर जायंट्स संघ आयपीएल 2022 पासून खेळत आहे. 2022, 2023 आणि 2024 लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व केएल राहुलने केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली संघ 2022 आणि 2023 मध्ये प्लेऑफसाठी पात्र ठरला होता, परंतु 2024 मध्ये संघाची कामगिरी घसरली. मेगा लिलावापूर्वी लखनौने केएल राहुललाही कायम ठेवले नाही. केएल राहुल पुढील हंगामात दिल्ली पॅपिटल्स संघाकडून खेळताना दिसणार आहे.

यष्टिरक्षक कर्णधाराची परंपरा!

पंतला कर्णधार बनवून लखनौ सुपरजायंट्सने आपली जुनी परंपरा कायम ठेवली आहे. पंत हा तिसरा हिंदुस्थानी यष्टिरक्षक आहे, ज्याला संजीव गोयंका यांच्या फ्रेंचायझीने कर्णधार बनवले आहे. पंतच्या आधी धोनीने पुणे सुपरजायंट्सचे नेतृत्व केले होते. यानंतर केएल राहुलला कर्णधारपद देण्यात आले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;