जळगावात सैराट… प्रेमविवाहाच्या वादातून तरुणाचा खून, खुनातील संशयितांच्या घरांची जाळपोळ

जळगावात सैराट… प्रेमविवाहाच्या वादातून तरुणाचा खून, खुनातील संशयितांच्या घरांची जाळपोळ

जळगावात रविवारी सैराटची पुनरावृत्ती झाली आहे. प्रेमविवाहाच्या वादातून शहरातील पिंप्राळय़ात तरुणाचा खून झाल्याची घटना घडल्याचे पडसाद उमटले असून संशयितांच्या घरांची जाळपोळ करण्याचा प्रयत्न सोमवारी करण्यात आला आहे. शहरातील पिंप्राळा हुडको येथे तरुणाच्या खून प्रकरणामध्ये संशयित आरोपींचे घर पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टळला आहे. दरम्यान, मयत तरुणाच्या नातेवाईकांनी आक्रोश करत हल्लेखोरांना अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली.

पिंप्राळा हुडको परिसरात प्रेमविवाह केल्याच्या जुन्या वादातून मुकेश रमेश शिरसाट (28) या तरुणाचा कोयता, चाकूने वार करून गंभीर जखमी करत निर्घृण खून करण्यात आला  होता. मयत तरुणाच्या घरातील 6 ते 7 जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. रामानंदनगर पोलीस ठाण्यात 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी 7 संशयित आरोपींना  अटक केली आहे. मयताच्या नातेवाईकांनी मारहाण करणारे आणि हल्लेखोर यांचे बंद घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही पोलीस ठाण्यासमोर आत्मदहन करू असा इशारा मयत मुकेश शिरसाट याची पत्नी, आई आणि बहीण यांनी दिला आहे.

मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

मुकेश शिरसाट याचे हत्येप्रकरणी मुकेशचा नातेवाईक सोनू रमेश शिरसाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून  सतीश जुलाल केदार, प्रकाश शंकर सोनवणे, सुरेश भुताजी बनसोडे, बबलू सुरेश बनसोडे, राहुल शांताराम सोनवणे, पंकज शांताराम सोनवणे, अश्विन सुरवाडे, विकी राजू गांगले, बबल्या राजू गांगले यांच्यासह एक अल्पवयीन मुलगा (सर्व रा. पिंप्राळा हुडको जळगाव) यांच्या विरोधात विविध कलमान्वये रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खून प्रकरणात पोलिसांनी 10 जणांनापैकी 7 जणांना ताब्यात घेतले आहे तर उर्वरित फरार झालेल्या संशयीतांचा शोध घेणे सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;