Kolkata Rape Case – प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर बलात्कार प्रकरणी संजय रॉयला जन्मठेप

Kolkata Rape Case – प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर बलात्कार प्रकरणी संजय रॉयला जन्मठेप

देशाला हादरवून सोडणाऱ्या कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरचा बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा अखेर निकाल लागला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉयला पश्चिम बंगालच्या सियादलाह न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर 50,000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील बलात्कार व हत्येसाठी आरोपी संजय रॉयला 18 जानेवारी रोजी बीएनएसच्या कलम 64, 66 आणि 103 (1) अंतर्गत दोषी ठरवण्यात आले होते. मागील वर्षी 9 ऑगस्टला ही धक्कादायक घटना घडली. 10 ऑगस्टला रॉयला अटक झाली. कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमधील सेमिनार हॉलमध्ये 31 वर्षीय निवासी महिला डॉक्टरचा मृतदेह आढळला. त्यानंतर देशभर एकच खळबळ उडाली होती. हॉस्पिटल प्रशासनाने सुरुवातीला बलात्काराची शक्यता नाकारली. परंतु नंतर शवविच्छेदनात बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले.

या खटल्याचे कामकाज 57 दिवसांमध्ये पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे याची सुनावणी इन-कॅमेरा झाली. सुरुवातीला या घटनेचा तपास स्थानिक पोलीस करत होते. नंतर सीबीआयकडे याचा तपास वर्ग करण्यात आला. सीबीआयने आरोपपत्र दाखल केल्यानंतर 12 नोव्हेंबर 2024 रोजी याची सुनावणी सुरू झाली. 9 जानेवारी 2025 रोजी साक्षी पुरावे नोंदवण्याचे काम पूर्ण झाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;