प्राजक्ता माळीनंतर तेजश्री प्रधानही थेट आश्रमाच्या वाटेवर; पोस्ट पाहून चाहत्यांना धक्का

प्राजक्ता माळीनंतर तेजश्री प्रधानही थेट आश्रमाच्या वाटेवर; पोस्ट पाहून चाहत्यांना धक्का

अनेक चित्रपट आणि मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर तिची ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका विशेष गाजत असताना या मालिकेतून तेजश्रीने अचानक एक्झिट घेतल्यानं सर्वांना धक्का बसला होता. मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असताना तेजश्रीने हा मोठा निर्णय घेतल्यामुळे तिच्या चाहत्यांनाही आश्चर्य वाटलं.

तेजश्री प्रधानच्या पोस्टमुळे चाहत्यांना आश्चर्य

तेजश्री मालिकेचा मुख्य चेहरा होती त्यामुळे तिने मालिका सोडताच या मालिकेचा टीआरपीही घसरला. मात्र आता मालिकेतून अचानक एक्झिट घेतल्यानंतर जेवढा धक्का चाहत्यांना बसला होता त्याहीपेक्षा जास्त आश्चर्य तेजश्रीने नुकतीच केलेली पोस्ट पाहून वाटलं आहे.

प्राजक्ता माळीच्या पाठोपाठ आता तेजश्रीनेही आश्रमाची वाट धरल्याचं दिसत आहे. मालिका सोडल्यानंतर तेजश्री थेट बंगळुरु आश्रमात पोहोचली आहे. तिची नवी पोस्ट चाहत्यांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

तेजश्री प्रधान श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात

प्राजक्ता माळीचे गुरु श्री श्री रविशंकर आहेत, जे आता सर्वश्रुत आहे. याच श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात तेजश्री सध्या वास्तव्यास आहे. याच आश्रमातील जेवणाच्या ताटाचा फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या जेवणाच्या ताटात वरण-भात, पापड, भाजी, असे काही पदार्थ पाहायला मिळत आहे. मालिका सोडल्यानंतर तेजश्री प्रधान आर्ट ऑफ लिविंग इंटरनॅशनल सेंटर आश्रमात बंगळुरूला पोहोचली आहे.

गेल्या काही आठवड्यांपूर्वी प्राजक्ता माळीनेही बंगळुरू आश्रमाला भेट दिली होती. तसेच प्राजक्तानंतर आता तेजश्रीही आता याच आश्रमात पोहोचली आहे. तिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत ती आश्रमात बंगळुरूला पोहोचली असल्याचं सांगितलं.

जेवणाचे फोटो अन्…

तेजश्रीने आश्रमातील जेवणाचे फोटो शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर तिचे हे फोटो व्हायरल होत आहे.तसेच तेजश्रीने वासराबरोबर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री वासरला प्रेमाने गोंजारताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत तेजश्रीने लिहिलं की, “आम्ही एकमेकांसारखे चेहरे केलेत की नाही…आणि यांच्या डोळ्याचं काय करायचं…किती तो निरागसपणा” असं कॅप्शनही तिने दिलं आहे.

दरम्यान, अभिनेत्री तेजश्री प्रधानने अपूर्वा नेमळेकरमुळे मालिका सोडल्याची चर्चा आहे. दोघींनीही एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. त्यामुळे दोघींच्या मैत्रीत फूट पडल्याचही सांगण्यात येतं आहे. यावर अद्याप अधिकृतरित्या मात्र कोणाकडूनही काहीही भाष्य करण्यात आलेलं नाही. मात्र तेजश्रीचे अचानक आश्रमातील फोटो पाहून चाहत्यांना नक्कीच आश्चर्य वाटलं आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;