Saif Ali Khan Attack – सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या मोहम्मद शहजादला 5 दिवसांची पोलीस कोठडी

Saif Ali Khan Attack – सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या मोहम्मद शहजादला 5 दिवसांची पोलीस कोठडी

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्या प्रकरणी आरोपी मोहम्मद शहजादला कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टने शहजादला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी आरोपीला ठाण्यातून अटक केली होती. यानंतर रविवारी वांद्रे कोर्टात आरोपीला हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी आरोपीला 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. मात्र न्यायालयाने आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

गेल्या 72 तासांपासून फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी शनिवारी रात्री बेड्या ठोकल्या. ठाण्यातील कासारवडवली भागातील हिरानंदानी लेबर कॅम्पमधून आरोपीला अटक करण्यात आली. आरोपी मोहम्मद शरीफूल हा विजय दास नावाने वावरत होता. पाच-सहा महिन्यांपूर्वीच तो मुंबईत आला असून एका हाउसकिपींग एजन्सीमध्ये काम करत होता, अशी माहिती मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली. तपासादरम्यान घटनास्थळावरुन सैफवर हल्ला केलेल्या चाकूचा एक तुकडा मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Saif Ali Khan Attack – सैफवर हल्ला करणारा बांगलादेशी घुसखोर, मुंबई पोलिसांची पत्रकार परिषदेत माहिती

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;