ना शुभेच्छा, ना अभिनंदन; बीडचं पालकमंत्रिपद अजितदादांना मिळताच भुजबळांची 3 शब्दात प्रतिक्रिया

ना शुभेच्छा, ना अभिनंदन; बीडचं पालकमंत्रिपद अजितदादांना मिळताच भुजबळांची 3 शब्दात प्रतिक्रिया

गेल्या महिन्याभरापासून रखडलेली पालकमंत्रिपदाची यादी अखेर शुक्रवारी जाहीर करण्यात आली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासह गुन्हेगारीमुळे गाजत असलेल्या बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. धनंजड मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला, मात्र बीडचे पालकमंत्रिपद पुन्हा अजित पवार गटाच्याच पारड्यात आले. यावर अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अवघ्या तीन शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादांना त्यांनी ना शुभेच्छा दिल्या, ना अभिनंदन केले. यामुळे भुजबळांची नाराजी कायम असल्याचे दिसते.

विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच अजित पवार गटाचे अधिवेशन होत आहे. शिर्डीत सुरू असलेल्या दोन दिवसीय अधिवेशनाला नाराज छगन भुजबळ यांनीही हजेरी लावली. यावेळीही माध्यमांशी बोलताना त्यांनी अजितदादांचा उल्लेख टाळला होता. त्यानंतर अधिवेशन अर्धवट सोडूनच ते मुंबईकडे रवाना झाले होते. आता पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि विविध विषयांवर भाष्य केले.

पक्षाच्या शिबिराला आलोय, कुणा व्यक्तीच्या नव्हे! नाराज भुजबळ शिर्डीत दाखल, धनंजय मुंडेंची दांडी

पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यानंतर मिंधे गटाचे भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली होती. यासह महायुतीतील अनेक नेते नाराज आहेत. यावर विचारले असता भुजबळ यांनी मला याबाबत काहीही माहिती नसल्याचे म्हटले. तसेच बीडच्या पालकमंत्रिपदी अजितदादांच्या नावाची मोहोर उमटली. याबाबत विचारले असता चांगली गोष्ट आहे, या तीन शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;