Photo – विद्यार्थ्यांनी केला योग विश्वविक्रम, इंडिया वर्ल्ड बुकमध्ये नोंद

Photo – विद्यार्थ्यांनी केला योग विश्वविक्रम, इंडिया वर्ल्ड बुकमध्ये नोंद

डी. ई. एस. प्रायमरी स्कूलच्या 1200  विद्यार्थ्यांनी प्राचीन ते आधुनिक काळापर्यंतचे ३० योगा प्रकार सादर करून इंडिया वर्ल्ड बुकमध्ये नोंद करीत विश्वविक्रमाला गवसणी घातली.

(फोटो – चंद्रकांत पालकर, पुणे)

अॅक्वा योगा, स्पिरिच्युअल योगा, पावर योगा, डंबेल योगा, मल्लखांब याच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थित भारावले.

सूर्यनमस्कार, चंद्रनमस्कार, ट्रायबल योगा, अॅड. निमल योगा, बर्ड पोजेस, दंड योगा, पार्टनर योगा, डंबेल रिव्होल्यूशनरी पोजेस, ताली योगा, हिदमिक योगा, इक्विमेंट योगा, थेरा बँड योगा, ब्रिक्स योगा, चेअर योगा, मेडिसनल बॉल योगा, योगा फॉर स्पोर्ट्स, डान्स योगा, पॅट्रियॉटिक मंडल योगा, अॅक्वा योगा, स्पिरिच्युअल योगा आणि पावर योगा असे प्रकार सादर केले.

ढोल-ताशा पथकाचे पालकांनी संचलन केले. मुख्याध्यापिका अर्चना धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिमरन गुजर, ग्रेसी डिसुझा, क्रीडाशिक्षिका योगिनी कानडे आणि सर्व शिक्षक यांनी संयोजन केले.

(फोटो – चंद्रकांत पालकर, पुणे)

डी. ई. एस.च्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष प्रमोद रावत, उपाध्यक्ष अॅड. अशोक पलांडे, कार्यवाह डॉ. आनंद काटिकर, डॉ. शरद कुंटे, प्रा. धनंजय कुलकर्णी, अॅड. राजश्री ठकार, खेमराज रणपिसे, मुख्याध्यापिका अर्चना धनावडे, डॉ. पल्लवी गव्हाणे, डॉ. सोपान कांगणे, विकी बारावरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;