Beed news – पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं; सराव करणाऱ्या तरुणांना बसनं चिरडलं, तिघांचा मृत्यू

Beed news – पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं; सराव करणाऱ्या तरुणांना बसनं चिरडलं, तिघांचा मृत्यू

पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांना भरधाव वेगातील बसने चिरडल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला असून दोघांचा जीव वाचला. बीड जवळील घोडका राजुरी फाट्यावर पहाटे साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या माहितीनुसार, राजुरी गावातील पाच तरुण सकाळी रस्त्यावर व्यायाम करत होते. यावेळी भरधाव वेगात आलेल्या बसने (क्र. एमएच 14बीटी 1473) तरुणांना उडवले. दाट धुक्यामुळे हा अपघात घडला असून यात ओम सुग्रीव घोडके (वय – 19) आणि विराट बाब्रुवान घोडके (वय – 18) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर सुबोध मोरे (वय – 19) हा जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की रस्त्यावर रक्ता, मांसाचा सडा पडला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;