राखमाफियांच्या दहशतीचे चटके; 150 कर्मचाऱ्यांची भुसावळला बदली

राखमाफियांच्या दहशतीचे चटके; 150 कर्मचाऱ्यांची भुसावळला बदली

संतोष देशमुख हत्याकांडानंतर परळीतील राखमाफियांच्या दहशतीची चर्चा राज्यभर सुरू झाली. राखमाफियांनी बदनाम केलेल्या थर्मलमध्ये आता बदल्यांचे उष्ण वारे वाहत आहेत. तब्बल 150 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी भुसावळला बदली करण्यात आली असून यापैकी अनेकांनी स्वतःहूनच बदली मागितली असल्याची माहिती आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत वाल्मीक कराडचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर परळीतील थर्मलच्या राखेचा मुद्दा ऐरणीवर आला. थर्मल अधिकाऱ्यांच्या कानशिलावर बंदूक ठेवून ओली आणि कोरडी राख बेकायदा विकून धनदांडगे बनलेल्या टोळभैरवांचे जथेच्या जथे परळीत आहेत. राखेच्या या बेकायदा विक्रीत थर्मलचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे. कितीही करडय़ा शिस्तीचा अधिकारी आला तरी या टोळभैरवांना हात लावण्याची त्याची हिंमत झाली नाही. परंतु संतोष देशमुख हत्याकांडानंतर वाल्मीक कराडला बेडय़ा पडल्या आणि त्याच्या जीवावर दांडगाई करणारे थर्मलमधील कर्मचारी, चिल्लर राखमाफिया हादरले.

परळी थर्मलची अधिक बदनामी टाळण्यासाठी येथील तब्बल 150 कर्मचाऱ्यांना भुसावळला हलवण्यात आले आहे. भुसावळ येथे सध्या 250 मेगावॅटचा प्रकल्प उभारण्यात येत असून त्यासाठी हे कर्मचारी हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले. परळीत सध्या 250 मेगावॅटचे 3 युनिट आहेत. यासाठी 900 कर्मचारी या ठिकाणी काम करतात. मात्र अतिरिक्त असल्याचे कारण दाखवून वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या या कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. बदली करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये स्वत: बदली अर्ज केलेले 12 जण तर कार्यालयाने बदली केलेले 82 असे एकुण 94 कर्मचारी भुसावळ येथील नवीन प्रकल्पाला हलवलेले आहेत. तर आणखी 50 कर्मचाऱ्यांची बदली प्रस्तावित आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;