Champions Trophy 2025- विजय हजारे करंडकात ‘या’ खेळाडूने धावांचा पाऊस पाडला, पण टीम इंडियात निवडच झाली नाही

Champions Trophy 2025- विजय हजारे करंडकात ‘या’ खेळाडूने धावांचा पाऊस पाडला, पण टीम इंडियात निवडच झाली नाही

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियामध्ये कोणाची निवड होणार, कोणाची नाही. यावर मागील अनेक दिवसांपूसन क्रीडा प्रेमींमध्ये चर्चा रंगली होती. या सर्व चर्चांना आता पूर्णविराम लागला असून हिंदुस्थानी संघाची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानचा संघ चॅम्पियन होण्यासाठी सज्ज झाला आहे. विजय हजारे करंडकात धावांचा पाऊस पाडणाऱ्या करुण नायरचा संघात समावेश करण्यात येईल अशी चाहत्यांना अपेक्षा होती. परंतु त्याला संघातून वगळण्यात आल्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये करुण नायरने गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले आहे. चौफेर फटकेबाजी करत त्याने आपल्या फलंदाजीची जादू वेळोवेळी दाखवून दिली आहे. विजय हजारे करंडकात सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज आहे. त्याने 8 सामन्यांमधील 7 डावांमध्ये 752 च्या सरासरीने 752 धावा चोपून काढल्या आहेत. यामध्ये 5 शतकांचा समावेश आहे. तसेच मागील 7 डावांमध्ये त्याने 7 वेळा 50 हून अधिका धावा केल्या आहेत. त्यामुळे क्रीडा प्रेमींमध्ये करुण नायरच्या फलंदाजीच जोरदार चर्चा आहे. मागील आठ वर्षांपासून करुण नायर संघातून बाहेर आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची हिंदुस्थानी संघात निवड होईल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. परंतु त्याला वगळण्यात आल्याने चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

पत्रकार परिषदे दरम्यान बीसीसीआय निवड समीतीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी करुण नायरला संघातून वगळण्यात आल्याबद्दल भाष्य केले. “750 हून अधिकची सरासरी खूपच चांगली आहे. परंतु हा 15 जणांचा संघ आहे, त्यामुळे प्रत्येकाचा समावेश करता येणार नाही.” असे अजित आगरकर म्हणाले आहेत.

चॅम्पियन ट्रॉफीसाठी हिंदुस्थानचा संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजा.

राखीव खेळाडू – हर्षित राणा

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;