Sai Ali Khan : चोरटा लोकलने मुंबईबाहेर पळाला ? 3 दिवसांनंतरही सैफच्या हल्लेखोराचा मागमूस लागेना

Sai Ali Khan : चोरटा लोकलने मुंबईबाहेर पळाला ? 3 दिवसांनंतरही सैफच्या हल्लेखोराचा मागमूस लागेना

अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून चोरीच्या प्रयत्नात असणाऱ्या आरोपीने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. बुधवारी मध्यरात्री घडलेल्या या हल्ल्याला आता तीन दिवस उलटून गेले असून हल्लेखोर अद्यापही पोलिसांच्या ताब्यात सापडलेला नाही. आता याप्रकरणी एक नवी अपडेट समोर आली आहे. सैफवर हल्ला करणारा आरोपी हा लोकल किंवा एक्स्प्रेस गाडी पकडून मुंबईच्या बाहेर गेल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त होत आहे.
पोलिसांची अनेक पथके लोकल आणि एक्स्प्रेस रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ला करणारा हा चोर हा सराईत असल्याचे दिसत नाही. आजपर्यंत पोलिसांना त्या चोराचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड सापडलेला नाही. तसेच त्याच्या कुटुंबीयांची किंवा मित्राचीही माहिती पोलिसांना मिळालेली नाही. या हल्ल्याला आता 48 तास उलटून गेल्यानंतरही पोलिसांना आरोपी अद्याप सापडला नाही. तांत्रिक नेटवर्ककडून कोणतीही मदत मिळालेली नाही त्यामुळे आता पोलीस हे एक्स्पर्टची मदत घेत आहेत.

पोलिस शोध घेत होते, आरोपी शर्ट बदलून फिरत होता

पोलीस तपास सुरू असतानाच आणखी एक माहिती समोर आली आहे, ती म्हणजे जेव्हा ज्या व्यक्तीनं सैफवर हल्ला केला, त्याने नंतर आपण पकडले जाऊ नये यासाठी आपले कपडे बदलले होते. सैफचं घर आणि वाद्रा येथील लकी हॉटेलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून असं समोर आलं की आरोपीने हल्ल्यानंतर आपला गेटअप बदलला. या हल्लेखोराने मध्यरात्री दोन ते अडीचदरम्यान सैफवर हल्ला केला, त्यानंतर तो सकाळी आठ वाजेपर्यंतच वांद्रा परिसरातच फिरत होता. मात्र तरी देखील पोलिसांना या आरोपीला पकडण्यात यश आलं नाही. पोलिसांना चकमा देण्यासाठी आरोपी ज्याप्रकारे कपडे बदलत आहे, त्यावरून त्याच्यावर कुठल्यातरी क्राइम वेबसिरीज किंवा क्राइम फिल्मचा प्रभाव असल्याचं दिसतंय. आरोपीचे कुटुंबीय किंवा मित्रपरिवाराचाही माग काढण्यात पोलिसांना यश आलेले नाही. सध्या मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेची जवळपास 30 पथके आरोपींचा शोध घेत आहेत. मुंबई पोलिसांना आरोपीचे रोज नवनवीन फोटो आणि सीसीटीव्ही फुटेज मिळत असले तरी आरोपी अद्याप फरार असून त्या कुठेही मागमूस लागत नाहीये.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;