शिवानी सोनारच्या लग्नातील ‘उत्साही कार्यकर्ते’, घरी लग्नविधींना सुरुवात

शिवानी सोनारच्या लग्नातील ‘उत्साही कार्यकर्ते’, घरी लग्नविधींना सुरुवात

झगमगत्या विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीच नाही तर, मराठी सेलिब्रिटी देखील नव्या आयुष्याची सुरुवात करत आहे. किरण गायकवाड-वैष्णवी कल्याणकर, शाल्व किंजवडेकर, राजस सुळे यांच्यानंतर अभिनत्री शिवानी सोनार आणि अभिनेता अंबर गणपुले लग्नबंधनात अडकणार आहे. त्यांच्या घरी लग्नविधींना सुरुवात देखील झाली आहे. शिवानी सोशल मीडियावर मुंडावळ्या बांधून काही फोटो पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र शिवानीच्या लग्नाची चर्चा सुरु आहे.

शिवानीच्या लग्नाआधीचे फोटो आणि व्हिडीओ समोर येत आहेत. खुद्द अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. अभिनेत्री इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. शिवानीने ‘टीम ब्राइड’सह ‘खंडेरायाच्या लग्नाला’ गाण्यावर रील देखील शेअर केलं आहे. शिवाय शिवानीच्या कुटुंबियांचा उत्साह देखील शिगेला पोहोचला आहे.

 

 

कुटुंबियांसोबत रील शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये ‘उत्साही कार्यकर्ते’ असं लिहिलं आहे. व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. अनेकांनी शिवानीवर शुभेच्छांचा वर्षाव देखील केला आहे. सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून शिवानीच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात शिवानी आणि अंबर यांनी साखरपुडा उरकला होता. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यानंतर शिवानी आणि अंबर यांच्या बॅचेलर पार्टीचे फोटोही चर्चेत आले. शिवानी-अंबरच्या लग्नाचा खास हॅशटॅगही चर्चेत आला. #AmbaAni असा हटके हॅशटॅग त्यांनी लग्नसाठी वापरला आहे.

 

 

शिवानी हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेमुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीत मोठी वाढ झाली. शिवानी हिने ‘राजा रानीची गं जोडी’ या मालिके शिवाय ‘सिंधूताई माझी माई’ आणि ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेतून चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

शिवानी मराठी टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर शिवानीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;