मुंबईतील प्रदूषणकारी 985 कंपन्यांवर कारवाई, 5 कोटी 85 लाखांचा महसूल जमा; एमपीसीबीचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

मुंबईतील प्रदूषणकारी 985 कंपन्यांवर कारवाई, 5 कोटी 85 लाखांचा महसूल जमा; एमपीसीबीचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

मुंबई महानगर परिसरात अनेक उद्योगधंदे असून हे उद्योगधंदे पर्यावरणाच्या मुळावर येत आहेत. विविध वस्तूंचे उत्पादन घेणाऱ्या कंपन्या जीवघेणा धूर ओकत असून त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. अशा प्रदूषणकारी 985 कंपन्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला असून त्यांच्याकडून 5 कोटी 85 लाख 73 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून तसे प्रतिज्ञापत्रच एमपीसीबीने हायकोर्टात दाखल केले आहे.

मुंबईच्या हवेचा दर्जा प्रदूषणामुळे घसरला असून या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने स्युमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली त्यावेळी राज्य सरकारच्या वतीने युक्तिवाद करताना अॅड. ज्योती चव्हाण यांनी एमपीसीबीमार्फत प्रतिज्ञापत्र सादर केले.  अति प्रदूषण करणाऱ्या लाल श्रेणीतील 1966 कंपन्यांनी स्वतः  ऑडिट केले असून त्याबाबतचा अहवाल सादर केला आहे तर उर्वरित कंपन्याही ऑडिटचा अहवाल सादर करणार असून प्रदूषण नियंत्रण महामंडळही वेळच्यावेळी त्याबाबत पाठपुरावा करत आहे, अशी माहिती सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी खंडपीठाला दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;