बायको दारू पिते ही क्रूरता नाही! हायकोर्टाने नवऱ्याची ‘उतरवली’

बायको दारू पिते ही क्रूरता नाही! हायकोर्टाने नवऱ्याची ‘उतरवली’

बायकोला दारूचे व्यसन असल्याचे सांगत घटस्पह्ट मागणारा नवरा उच्च न्यायालयात तोंडावर आपटला. बायकोला दारू पिण्याची सवय असणे ही क्रूरता नाही. बायको दारूच्या नशेत जोपर्यंत नवऱयाला त्रास वा त्याच्याशी गैरवर्तन करीत नाही तोपर्यंत तिच्या व्यसनाला क्रूरता म्हणताच येणार नाही, असे महत्त्वपूर्ण मत न्यायालयाने नोंदवले आणि नवऱयाला ‘जोर का झटका’ दिला.

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विवेक चौधरी आणि ओम प्रकाश शुक्ला यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. बायकोने दारूच्या नशेत त्रास दिल्याचा कोणताही पुरावा याचिकाकर्त्याने दिलेला नाही. मात्र दोघे अनेक वर्षे वेगळे राहत असल्याने दुराव्याच्या आधारे न्यायालयाने घटस्पह्टाला मंजुरी दिली.

न्यायालय म्हणाले…

  • क्रूरता व साथ सोडणे या गोष्टी वेगळ्या आहेत. बायको दारू पिते हे एक कृत्य क्रूरता ठरू शकत नाही.
  • बायकोच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे जन्मलेल्या मुलाला कोणतीही शारीरिक कमजोरी किंवा जन्मलेले मूल पूर्णपणे तंदुरुस्त नाही, असे कुठेही सिद्ध झालेले नाही.
  • नवरा-बायको लग्नानंतरच्या वर्षातच एकमेकांपासून वेगळे झाले. अनेक वर्षांच्या दुराव्यामुळे ते पुन्हा एकत्र नांदण्याची चिन्हे नाहीत. हा घटस्पह्टाचा आधार ठरतो.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;