जालन्यातील परतूर पोलिसाची कारवाई, गोवंशानी भरलेले 2 आयशर टेम्पो पकडले; 20 लाखाचा मुद्देमाल जप्त

जालन्यातील परतूर पोलिसाची कारवाई, गोवंशानी भरलेले 2 आयशर टेम्पो पकडले; 20 लाखाचा मुद्देमाल जप्त

जालना जिल्ह्यातील परतुर पोलिसांनी 16 जानेवारी रोजी मध्यरात्री गोवशांनी भरलेलेले 2 आयशर टेम्पो पकडले असून गोवंशाची कत्तलीपासून सुटका करत चार आरोपीला अटक करुन 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. परतूर पोलीस यांना मिळलेल्या गुप्त माहितीवरून गोवंशीय जनावरांना कत्तलसाठी जालना येथून परभणी येथे घेऊन जात असताना मांगीरबाबा चौक परतूर येथे दोन आयशर अडवून त्यांची झडती घेतली असता त्यामध्ये एकूण 32 गोवंशीय बैल जनावरे मिळून आले आहेत. त्यांची विचारपूस केली असता परभणी येथे कत्तल खान्यात घेऊन जात असल्याचे समजले. एकूण 32 जनावरे किंमत 4 लाख 85 हजार रुपये आणि आयशर टेम्पो किंमत 16 लाख रुपये असा एकूण 20 लाख 85 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कत्तलखान्यात जाणारे सर्व जनावरं जप्त करून पारडगाव येथील गोशाळेत जमा केले आहेत. यामध्ये आरोपी कुनजर्‍या मध्य प्रदेश, मुस्ताक सुपडू शेख रा. सावदा ता. जि. जळगाव, नदीम अख्तर हमीद अन्सारी रा. मालेगाव जि नाशिक, अस्लम फकिरा शेख रा. पाचोरा जि. जळगांव यांच्यावर परतुर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले करून आयशर टेम्पो जप्त करून कारवाई केली आहे. सदरची कारवाई अजय कुमार बंसल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, परतुर उपविभागीय पोलीस अधिकारी दादाहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली परतुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम.टी.सुरवसे, उपनिरीक्षक भिमराव मुंढे, पोकॉ. दीपक आढे, पोकॉ. अचुत चव्हाण, पोकॉ. ज्ञानेशोर वाघ,पोकॉ/देवा जाधव, पोकॉ. राम पारवे, चालक पोकॉ. स्वप्नील फंड यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;