मुंबई महापालिकेवर भगवा डौलाने फडकवा! शिवसेना नेते अनिल परब यांचे गटप्रमुखांना आवाहन

मुंबई महापालिकेवर भगवा डौलाने फडकवा! शिवसेना नेते अनिल परब यांचे गटप्रमुखांना आवाहन

शिवसेना ही नुसती निवडणुकीसाठी कार्य करणारी संघटना नसून 365 दिवस जनतेच्या प्रश्नांसाठी राबणारी संघटना आहे. मतदारांच्या सुखदुःखात तसेच त्याच्या अडचणींसाठी गटप्रमुख हा सदैव तत्पर असतो. त्यामुळे शिवसेनेचे गटप्रमुखच मुंबई महापालिकेवर भगवा डौलाने फडकवतील, असा विश्वास शिवसेना नेते आमदार अनिल परब यांनी व्यक्त केला.

शिवसेना विभाग 1 मधील पुरुष व महिला गटप्रमुखांचा भव्य मेळावा मागाठणे येथील स्वर्गीय अनंतराव भोसले मैदानात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, मुंबईमध्ये बाळासाहेबांचे विचार मानणारा मतदारांचा एक मोठा वर्ग आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना केलेले काम व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा तरुणांमध्ये असलेला प्रभाव आणि मतदार या जोरावर शिवसेनेला आगामी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये चांगलेच यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मेळाव्याचे आयोजन शिवसेना विभागप्रमुख उदेश पाटेकर आणि विभाग संघटक सुजाता शिंगाडे यांनी केले होते. मेळावा यशस्वी होण्यासाठी सहकार्य करणारे नंदकुमार मोरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

पदवीधर, सिनेट निवडणुकीप्रमाणे काम करा!

मुंबई महापालिकेची निवडणूक ही फक्त एका प्रभागापुरती मर्यादित असते. त्या प्रभागातील गटप्रमुखांचा मतदारांबरोबर चांगला संपर्प असतो. ज्याप्रमाणे पदवीधर व सिनेट निवडणुकीत गटप्रमुखांनी प्रत्येकी 10 ते 20 मतदारांची जबाबदारी घेऊन विजय मिळवून दिला. त्याचप्रमाणे आता यादीनिहाय 300 ते 400 मतदारांपर्यंत पोहोचावे, असे आवाहनही परब यांनी केले.

पोलिंग एजंट आताच तयार करा!

शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरुरकर यांनी गटप्रमुखांच्या जबाबदाऱयांची जाणीव करून दिली तसेच गटप्रमुखांनी आपल्या यादीतील पोलिंग एजंट आतापासून तयार करावेत, जेणेकरून निवडणुकीच्या वेळेस धावपळ होणार नाही व मतदानाच्या वेळी मतदारांना ओळखू शकतील, असे सांगितले.

सदस्य नोंदणीवर भर द्यावा!

गटप्रमुखांनी शिवसेना सदस्य नोंदणीत जास्तीत जास्त भर द्यावा. शिवसेना ही कार्यकर्त्यांची संघटना असून आजपर्यंत शिवसेनेतील अनेक उपशाखाप्रमुख, गटप्रमुख व शाखाप्रमुख हे नगरसेवक व आमदार पदापर्यंत पोहोचले आहेत, असे शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर म्हणाले.

आधीपेक्षा जास्त जागा जिंकू

मुंबईत सध्या मराठी माणसांवर वारंवार अन्याय होत असताना आपण पाहत आहोत. परंतु मराठी माणसांच्या अन्यायावर वाचा पह्डणारी एकच संघटना ही शिवसेना आहे, हा विश्वास मुंबईकरांना आहे. त्यामुळे सर्व गटप्रमुखांनी जोमाने कामाला लागावे. मागील महापालिका निवडणुकीत विभाग क्रमांक 1 मध्ये भाजपबरोबर युती नसतानाही 20 पैकी 10 नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले होते. या निवडणुकीत 12 ते 14 जागांवर शिवसेना विजय मिळवेल, असा विश्वास माजी आमदार विलास पोतनीस यांनी व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;