Saif Ali Khan Attack : सैफच नव्हे तर पतौडी कुटुंबातील ‘या’ सदस्याच्या घरीही घुसला होता चोर, काय आहे प्रकरण ?

Saif Ali Khan Attack : सैफच नव्हे तर पतौडी कुटुंबातील ‘या’ सदस्याच्या घरीही घुसला होता चोर, काय आहे प्रकरण ?

बॉलिवूडचा प्रख्यात अभिनेता सैफ अली खान याच्या घरात बुधवारी रात्री घुसलेल्या चोर घुसला आणि झटापटीत त्याने सैफवर चाकूने हल्ला केला. अनेक जखमांमुळे गंभीर जखमी झालेल्या सैफला तातडीने लीलीवाती रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली. या हल्ल्यात सैफच्या घरातील, तैमूर- जेह या मुलांची केअरटेकरही जखमी झाली, तिच्यावरही रुग्णालयात उपचार करण्यात आले असून पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेतला आहे. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला असून सीसीटीव्हीमधील त्याचा चेहरा कॅप्चर झाला, त्याचा फोटो जारी करण्यात आला असून पोलीसांकडून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. मात्र या हल्ल्याला आता 24 तासांपेक्षाही अधिक काळ उलटून गेला असून अजूनही आरोपीला अटक न झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान सैफच्या घरात जशी चोरी झाली होती, तसाच चोरीचा एक प्रयत्न त्याच्या कुटुंबातील आणखी एका सदस्याच्या घरातही झाला होता. पतौडी कुटुंबातील महत्वाचा सदस्य असलेल्या व्यक्तीच्या घरात सुमारे 13-14 वर्षांपूर्वी चोरीचा प्रयत्न झाला होता. ती व्यक्ती म्हणजे सैफ याची बहीण, अभिनेत्री सोहा अली खान हिच्या घरातही चोर घुसला होता, अशी माहिती समोर आली आहे.

काय आहे प्रकरण ?

मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2011 मध्ये सोहा अली खान हिच्या घरात चोरीचा प्रयत्न झाला होता. तेव्हा सोहा अली खान ही कुणाल खेमूला डेट करत होती. सोहाच्या खार येथील फ्लॅटमध्ये एका चोराने घुसण्याचा प्रयत्न केला होता. 2011 साली कुणाल खेमूच्या आगामी चित्रपटाचा प्रिव्ह्यू अटेंड करून सोहा आणि कुणाल रात्री खार येथील सोहाच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटवर परत आले. जेवण झाल्यानंतर ते गप्पा मारत असतानाच अचानक बाल्कनीमधून त्यांना आवाज ऐकू आला. तो ऐकून कुणाल तातडीने गॅलरीत गेला, तेव्हा एक चोर त्यांच्या घरात घुसायचा प्रयत्न करत असल्याचं त्याला दिसलं.

चोराला कसं पकडलं ?

मात्र समोर कुणालल पाहून तो चोर घाबरला, गडबडला आणि त्याने पहिल्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. पण गडबडीत त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला. परत उभं राहून पळून जाण्याचा प्रयत्न त्या चोराने केला, पण तोपर्यंत कुणाल खेमू हा जिन्यावरून धावत खाली उतरला आणि त्याचे अज्ञात घुसखोराला पटकन पकडलं. प्राथमिक तपासात असे दिसून आले की तो कुख्यात चोर होता, आणि त्याने याआधी चोरीचे असे अनेक गुन्हे केले होते. सैफ अली खानवर नुकत्याच झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना पुन्हा चर्चेत आली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;