10 पैकी 8 जणांना हवीय नवी नोकरी

10 पैकी 8 जणांना हवीय नवी नोकरी

हिंदुस्थानात नोकरीची समस्या हा एक प्रमुख मुद्दा आहे. देशात 10 पैकी 8 जण नोकऱया शोधत आहेत. नव्या वर्षात नोकऱया शोधणे आणखी अवघड असल्याचे 55 टक्क्यांहून अधिक लोकांचे म्हणणे आहे. लिंक्डइनने केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. देशातील 69 टक्के एचआर प्रोफेशनल्सचे म्हणणे आहे की, नोकऱया शोधणं पहिल्यापेक्षा अधिक कठीण झालंय. 2025 मध्ये नोकरी शोधण्याच्या पद्धतीत बदल होण्याची गरज व्यक्त होत आहे. 37 टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार, ते 2025 मध्ये नोकरी शोधत नाहीत. 58 टक्के लोकांना आशा आहे की, यावर्षी नोकरीचे मार्पेट चांगले असेल आणि त्यांना नवीन नोकऱया मिळू शकतील. हिंदुस्थानात 60 टक्के लोक नव्या सेक्टरमध्ये काम करण्यास तयार आहेत.

कौशल्याचा अभाव

लिंक्डइनच्या अभ्यासानुसार, अनेकजण वेगवेगळय़ा ठिकाणी एकाचवेळी नोकरीसाठी अर्ज करत आहेत. 49 टक्के लोक पहिल्यापेक्षा जास्त अर्ज करत आहेत. मात्र त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. 27 टक्के एचआर प्रोफेशनल्स प्रत्येक दिवशी 3 ते 5 तास केवळ अर्ज बघण्यात घालवत आहेत. 55 टक्के लोकांचे म्हणणे आहे की त्यांच्याकडे नोकरीचे अर्ज येतात. मात्र काwशल्य नसल्याचे दिसून येतंय.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;