मध्यरात्री घरी आलेल्या हल्लेखोराशी करीनाचा झालेला सामना, हल्लेखोराचं वर्णन समोर

मध्यरात्री घरी आलेल्या हल्लेखोराशी करीनाचा झालेला सामना, हल्लेखोराचं वर्णन समोर

Saif Ali Khan: गुरुवारी मध्यरात्री झालेल्या हल्ल्यात अभिनेता सैफ अली खान गंभीर जखमी झाला आहे. सध्या सैफवर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहे. शस्त्रकियेनंतर अभिनेत्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तर दुसरीकडे पोलीस प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी लवकरच अभिनेत्री करीना कपूरचा देखील जबाब नोंदवला जाण्याची शक्यता वर्तण्यात येत आहे. आरोपीचा सुगावा अद्याप न लागल्याने आरोपी संदर्भात काही अधिक माहिती मिळते का? यासाठी करीनाचा जबाब महत्त्वाचा आहे… अशी माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री घरी आलेल्या हल्लेखोराशी करीनाचा देखील सामना झाला होता. त्यामुळे याप्रकरणी करीना पोलिसांना काय माहिती देणार… याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवाय सोशल मीडियावर देखील करीना आणि सैफ यांच्या घराचे फोटो व्हायरल होत आहेत.

हल्लेखोराचं वर्णन

अज्ञात हल्लेखोराचं अंदाजे वय 35 ते 40 वर्षे असून सावळा वर्ण, बांधा सडपातळ, उंची अंदाजे 5 फुट 5 इंच,  काळसर रंगाची पॅन्ट आणि गडद रंगाचे शर्ट, डोक्यावर कॅप असं हल्लेखोराच वर्णन असून पळतानाच सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आल आहे.

सैफ अली खानच्या शरीरात अडकलेला हेक्सब्लेडचा तुकडा

अभिनेता सैफ अली खानच्या शरीरातून काढलेला धारदार हेक्सब्लेडचा तुकडा पोलिसांनी जप्त केला आहे. हल्लेखोराने केलेल्या हल्यात सैफ जखमी झाला होता. त्या दरम्यान हेक्सब्लेडचा तुकडा सैफच्या शरीरात राहून गेलं होतं. लीलावतीमध्ये डॉकटरच्या टीमने आपरेशन करून सदर तुकडा काढला होता. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खानवर हल्ला होऊन 24 तासांहून अधिक काळ झाला आहे. त्यानंतरही मुंबई पोलिसांसमोर असे अनेक प्रश्न आहेत ज्यांचा पोलिस तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी वांद्रे पोलिसांनी सैफ अली खानच्या सोसायटीतील सफाई कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी आणले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेच्या 20 हून अधिक पथके करत आहेत. लवकरच आरोपींबाबत मोठे अपडेट मिळू शकतात, असं पोलीस सूत्रांचे म्हणणं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;