सैफ अली खान हल्ला प्रकरण, पोलीस करत आहेत ‘या’ गोष्टींचा तपास, जाणून व्हाल हैराण

सैफ अली खान हल्ला प्रकरण, पोलीस करत आहेत ‘या’ गोष्टींचा तपास, जाणून व्हाल हैराण

अभिनेता सैफ अली खानच्या घराच्या फ्लोअर पॉलिशिंगचं काम करणाऱ्या दोन व्यक्तींची वांद्रे पोलिस चौकशी करत असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिस अधिकाऱ्यांना असा संशय आहे की, खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला इमारत परिसराबाबत माहिती होती का ? त्याने 11 व्या मजल्यावर पोहोचण्यासाठी पायऱ्यांचा वापर केला, जिथे सैफ अली खान त्याच्या कुटुंबासह राहतो. इतर फ्लोअरवर न शिरता आरोपी थेट 11 व्या माळ्यावरच कसा शिरला? यावरून त्याला इमारतीतील प्रत्येक गोष्टीची माहिती होती का? अशा गोष्टींची कसून चौकशी पोलीस करत आहेत.

पोलीस असाही प्रश्न उपस्थित करत आहेत की, फ्लोअरिंग पॉलिशिंगसाठी आलेल्या व्यक्तींशी आरोपीचा काही संबध आहे का? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संशयिताला शेवटचं इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून खाली पळताना सीसीटिव्हीत कैद करण्यात आलं होतं.

मात्र घराच्या लॉबीमध्ये प्रवेश करताना किंवा बाहेर पडताना तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला नाही. दरम्यान संशयित आरोपी ज्या सहाव्या माळ्यावरील सिसीटिव्हीत दिसून आला आहे तो कॅमेरा 6 व्या माळ्यावरील एका रहिवाशांने लावला आहे. मात्र त्यानंतर आरोपी इमारतीबाहेर पळताना, इमारती परिसरात लावण्यात आलेल्या सिसीटिव्हीत किंवा मुख्यप्रवेश द्वारातून बाहेर पडतानाही दिसत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.त्यामुळे या हल्यात इतर कोण आरोपी सहभागी आहे का ? याचा पोलिस तपास करत आहेत.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला होऊन 24 तासांहून अधिक काळ झाला आहे. त्यानंतरही मुंबई पोलिसांसमोर असे अनेक प्रश्न आहेत ज्यांचा पोलिस तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी बांद्रा पोलिसांनी सैफ अली खानच्या सोसायटीतील सफाई कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी आणले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेच्या 20 हून अधिक पथके करत आहेत. लवकरच आरोपींबाबत मोठे अपडेट मिळू शकतात, असं पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.

कशी आहे सैफ अली खानची प्रकृती?

हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला आहे. अभिनेत्याच्या मणक्यात लागलं असून त्याच्या स्पायनल कॉर्डला धक्का बसून गंभीर जखम झाली आहे. हात आणि मानेवर देखील मोठ्या जखमा झाल्या आहेत. स्पायनल इंज्युरी झाली असून मणक्यातून 2.5 इंचाचा चाकूचे काचेचे पाते बाहेर काढले आहे. सध्या सैफ अली खान याची प्रकृती स्थिर असून कोणताही धोका नसल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;