एमडी तस्करी करणाऱ्या नायजेरियनला अटक

एमडी तस्करी करणाऱ्या नायजेरियनला अटक

एमडी ड्रग्जची तस्करी करण्यासाठी आलेल्या एका नायजेरियनला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाला यश आले आहे. जॉन जेम्स फ्रान्सिस ऊर्फ ओनाह चिडोझी एथलबर्ट ऊर्फ जॉन इझुग्वा फ्रान्सिस (45) असे अटक केलेल्या नायजेरियनचे नाव आहे. हा नायजेरियन सराईत गुन्हेगार असून तो 6 वर्षे शिक्षा भोगून नोव्हेंबर 2024मध्ये कारागृहातून बाहेर आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. शिळफाटा येथील खिडकाळी रोडवरील देसाईनाका परिसरात एक जण एमडी ड्रग्जची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्याकडून 66 लाख 18 हजार रुपये किमतीची 661.8 ग्रॅम एमडी पावडर मिळून आली. त्यानुसार पोलिसांनी शीळ डायघर पोलिसांनी त्याला अटक केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;