राम तेरी गंगा मैली, डुबकी मारल्यावर त्वचारोग होतो; मुनगंटीवारांचं विधान व्हायरल

राम तेरी गंगा मैली, डुबकी मारल्यावर त्वचारोग होतो; मुनगंटीवारांचं विधान व्हायरल

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी काही निर्णय घेतले त्यात गंगा प्रदुषणाबाबत देखील एक निर्णय घेतला होता. नमामी गंगे या त्यांच्या प्रोजेक्टला तब्बल दहा वर्ष होऊनही अद्याप गंगेतलं प्रदूषण कमी झालेले नसल्याचे सांगत भाजपच्याच नेत्याने त्यांच्या या प्रकल्पाचे वाभाडे काढले. चंद्रपुरात वातावरण बदलावर सुरू झालेल्या परिषदेत बोलताना माजी मंत्री व भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ”गंगेत डुबकी मारल्यावर त्वचारोग होतं हे ऐकूनच अंगावर काटा येतो”, असं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सध्या उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरू आहे. ”महाकुंभ 144 वर्षांनी प्रयागराजमध्ये होत आहे. तिथे डुबकी मारल्यावर त्वचारोग होतं हे ऐकूनच अंगावर काटा येतो. राम तेरी गंगा मैली हे ऐकावं लागतंय बघावं लागतंय. अमृताचा एक थेंब तिथे पडला म्हणून तिथे कुंभ होतोय पण त्या अमृताच्या थेंबाला देखील आपण विष बनवून टाकलं. याचा आपण विचार करायला हवा, असे मुनगंटीवार म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;