मेटामध्ये 3600 कर्मचाऱ्यांची नोकरकपात

मेटामध्ये 3600 कर्मचाऱ्यांची नोकरकपात

मेटा  पुन्हा एकदा परफॉर्म्सच्या आधारावर मोठी नोकरकपात करण्याच्या तयारीत आहे. कंपनी जवळपास 3 हजार 600 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार असल्याची माहिती आहे. कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी यासंबंधीचे संकेत नुकतेच दिले आहेत. मेटा कंपनी एकूण कर्मचाऱ्यांपैकी जवळपास 5 टक्के नोकरकपात करणार आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या मेलमध्ये सांगण्यात आले की, कंपनीने परफॉर्म्स मॅनेजमेंट स्टँडर्डच्या आधारे खराब परफॉर्म्स कर्मचाऱ्यांना डच्चू देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने हे पाऊल 2023 च्या इयर ऑफ इफिशिएन्सी मोहीमअंतर्गत उचलण्यात आले आहे. ज्यात याआधी 10 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांना खराब परफॉर्मन्स भोवणार

कंपनीचा फोकस आर्टिफिशियल इंटेलिजन्स, स्मार्ट ग्लास आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरसुद्धा होईल. झुकरबर्ग यांनी आगामी वर्षाला इंटेंस म्हटले आहे. हे सर्व नुकत्याच जारी केलेल्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे. सप्टेंबर 2024 पर्यंत मेटाकडे जवळपास 72 हजार कर्मचारी होते, परंतु आता ही संख्या फारच कमी झाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;