लंडनमध्ये पँटशिवाय फिरतायत तरुण-तरुणी, काय आहे ‘नो ट्राउजर ट्यूब राइड’? जाणून घ्या…

लंडनमध्ये पँटशिवाय फिरतायत तरुण-तरुणी, काय आहे ‘नो ट्राउजर ट्यूब राइड’? जाणून घ्या…

कमरेच्या वर पूर्ण कपडे, पायात शूज आणि मोजे, पण खाली फक्त अंडरवेअर, अचानक रस्त्यावर अनेक लोकांना असं पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटू शकतं. मात्र हे चित्र लंडन मेट्रोत पाहायला मिळालं आहे. गेल्या रविवारी म्हणजे 12 जानेवारीला जेव्हा लंडनमध्ये सरासरी तापमान 4 अंश होतं, त्यावेळी शेकडो तरुण, तरुणी आणि वृद्ध अंडरवेअरमध्ये लंडन ट्यूब म्हणजेच मेट्रोमध्ये प्रवास करत होते.

हे सर्व लोक ‘नो ट्राउजर ट्यूब राइड’ (No Trousers Tube Ride) म्हणजेच ‘नो पँट्स डे’ (No Pants Day) हा इव्हेंट साजरा करत होते. दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या या दिवशी येथील लोक पँटशिवाय फिरताना दिसतात. यातच नो ट्राउजर ट्यूब राइड म्हणजे काय आणि याची सुरुवात कशी झाली? हे आपण जाणून घेणार आहोत…

नो ट्राउजर ट्यूब राइडची सुरुवात कशी झाली?

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, याची सुरुवात 2002 मध्ये न्यूयॉर्कमध्ये झाली. यानंतर बर्लिन, प्राग आणि वॉशिंग्टन डीसी सारख्या शहरांमध्ये लोक हा इव्हेंट साजरा करू लागले. ‘नो ट्राउजर ट्यूब राइड’ इव्हेंटचा आयोजक डेव्ह सेलकिर्क याने याबाबत माहिती देताना सांगितलं की, ”हा इव्हेंट निव्वळ मनोरंजनासाठी आहे. इतरांना आनंदी करणे आणि आपल्या आजूबाजूला आनंद पसरवणे, हे या इव्हेंटचं उद्दिष्ट आहे.”

TOI च्या वृत्तानुसार, नो ट्राउझर्स ट्यूब राइड ही न्यूयॉर्क कॉमेडियन चार्ली टॉडने तयार केलेल्या स्टंटपासून प्रेरित आहे. बीबीसीशी बोलताना टॉड म्हणाला की, “या इव्हेंट उद्देश इतर लोकांचे मनोरंजन करणे आणि लोकांना हसवणे हा आहे.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;