मकरसंक्रांतीला आशु-शिवाच्या नात्यात तिळगुळाचा गोडवा येईल का? मालिकेत रंजक ट्विस्ट
झी मराठी वाहिनीवरील 'शिवा' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. नेहामुळे कथानकात ट्विस्ट येताना दिसत आहेत. सीताईच्या दडपणाखाली आणि शिवाच्या आव्हानामुळे चिडलेल्या आशूने अखेर नेहाशी लग्न करणार असल्याची घोषणा केली आहे.
नेहा शिवाला सांगते की आशूने लग्नाला होकार दिला आहे. यामुळे शिवाला खूप आनंद झालाय. आशूच्या मनात तिच्याविषयीच्या भावना वाढतील, अशी शिवाला अपेक्षा आहे. शिवा सगळ्यांना सांगते की आशूची चांगल्याप्रकारे काळजी घ्या.
दुसरीकडे दिव्या ही शिवा आणि नेहाला एकत्र बोलताना पाहते. नेहा आशूसमोर शिवाच्या हावभावांची नक्कल करते, ज्यामुळे आशूच्या मनात शिवाचा विचार अधिकच पक्का होतो. आशूच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे.
दरम्यान, शिवा आणि आशू एका आजारी महिलेला वाचवण्यासाठी एकत्र येतात. या घटनेमुळे आशूला शिवाच्या प्रामाणिकतेवर विश्वास बसतो. याआधी आशू आणि शिवा कंपनीच्या बोर्ड मीटिंगसाठी म्हणून एकत्र येतात, त्यात शिवाचा मुद्दा भाऊ उचलून धरतात. पण आशूला हे पटत नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List