कपूर घराण्यात आली नवी सून; गोव्यातील समुद्रकिनारी पार पडला लग्नसोहळा

कपूर घराण्यात आली नवी सून; गोव्यातील समुद्रकिनारी पार पडला लग्नसोहळा

बॉलिवूडमधील कपूर घराण्यात सध्या लग्नाची धूम पहायला मिळतेय. राज कपूर यांचा नातू आणि करिश्मा, करीना, रणबीर कपूर यांचा चुलत भाऊ आदर जैन नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. गोव्यात आदरने गर्लफ्रेंड आलेखा अडवाणीशी लग्न केलं. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कपूर कुटुंबातील अनेकजण या लग्नाला उपस्थित होते. आलेखा आणि आदरने ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलंय. त्यानंतर ते हिंदू विवाहपद्धतीनुसारही लग्न करणार असल्याचं कळतंय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये कपूर कुटुंबातील अनेक सदस्य पहायला मिळत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आदर आणि आलेखाचा रोका पार पडला होता. या कार्यक्रमाला करीना कपूर, करिश्मा कपूर, रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि नीतू कपूर यांसारखे सेलिब्रिटी उपस्थित होते.

आदर जैन याआधी अभिनेत्री तारा सुतारियाला डेट करत होता. 2020 पासून हे दोघं एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. मात्र 2023 मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला. आश्चर्याची बाब म्हणजे आलेखा ही ताराचीच खास मैत्रीण आहे. आदर आणि आलेखा एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. ताराने ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर दुसरीकडे आलेखा अडवाणी ही ‘वे वेल’ या मुंबईतील कम्युनिटीची संस्थापिका आहे. या कम्युनिटीअंतर्गत वेलनेस इव्हेंट्स, वर्कशॉप्स, सेशन्स आणि रिट्रीट्स आयोजित केले जातात. आलेखाने न्यूयॉर्कमधील कॉर्नेल हॉटेल स्कूलमधून पदवीचं शिक्षण घेतलंय. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला बरेच बॉलिवूड सेलिब्रिटी फॉलो करतात. यामध्ये कियारा अडवाणी, अथिया शेट्टी आणि तारा सुतारिया यांचा समावेश आहे.

कोण आहे आदर जैन?

आदर जैन हा राज कपूर यांचा नातू आहे. राज कपूर यांची मुलगी रिमा जैन यांचा तो मुलगा आहे. रणबीर कपूर, करीना आणि करिश्मा कपूर यांचा तो चुलत भाऊ आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची जोरदार चर्चा होती. त्याने ‘ऐ दिल है मुश्कील’ या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;