कोकणी, मालवणी माणूस मुंबई महापालिकेवर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही – सुनील प्रभू

कोकणी, मालवणी माणूस मुंबई महापालिकेवर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही – सुनील प्रभू

मुंबई महानगरपालिका निवडणूक लवकरच होणार आहे. मुंबई ही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे, शिवसेनेचीच आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत मुंबई महापालिकेवर कोकणी, मालवणी माणूसच भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते, विधानसभेतील शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांनी विश्वास व्यक्त केला.

बोरिवली पूर्व येथील जय महाराष्ट्रनगर येथील पै. अनंतराव भोसले मैदानावर शिवसेना शाखा क्रमांक 14 आयोजित आणि शिवसेना शाखा क्रमांक 12 तसेच मागाठाणे मित्र मंडळाच्या सहकार्याने मालवणी महोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. या महोत्सवाची सांगता शिवसेना नेते सुनील प्रभू आणि आमदार महेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी या दोघांनी आयोजकांचे कौतुक करताना कोकणी, मालवणी चाकरमान्यांनी ओसंडून वाहणारे मैदान हीच खरी शिवसेना असल्याचे सांगितले. कोकणी माणूस आणि शिवसेना वेगळी करताच येणार नाही. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार खऱ्या अर्थाने कोकणी, मालवणी माणसाने पुढे नेण्याचे काम केले आहे. या मालवणी महोत्सवामुळेच कोकणी माणसाला शिवसेनेने बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे, असेही सुनील प्रभू यांनी सांगितले. उत्सवप्रमुख नंदकुमार मोरे यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. पाहुण्यांच्या हस्ते मालवणी महोत्सव आणि देव गिरोबा मंदिर उभारणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आले. शिवसेना शाखा क्रमांक 14, 12 चे सर्व पदाधिकारी, मागाठाणे मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी हा महोत्सव यशस्वी केला.

दादरमध्येही मालवणी जत्रोत्सव

दादरमध्ये सगळ्या जत्रा होतात, पण मालवणी जत्रोत्सव होत नाही, अशी खंत माहीमचे आमदार, विभागप्रमुख महेश सावंत यांनी व्यक्त केली. मात्र, येत्या काळात दादरमध्येही मालवणी जत्रोत्सव भरवण्याचे सूतोवाच त्यांनी केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;