पतीला सुधारण्यासाठी पत्नीने केलेली खोटी तक्रार क्रूरताच, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

पतीला सुधारण्यासाठी पत्नीने केलेली खोटी तक्रार क्रूरताच, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

पतीची वागणूक सुधरवण्यासाठी पत्नीने खोटी तक्रार केल्यास ती क्रूरताच ठरते, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. पत्नीने पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली होती. त्याचवेळी घटस्पह्टाची मागणी करण्यात आली होती. कुटुंब न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला. कौटुंबिक हिंसाचाराच्या आरोपातून पतीची निर्दोष सुटका करण्यात आली. त्याविरोधात पत्नीने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले.

न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. अद्वित सेठना यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. पत्नीने जर पती व सासरच्यांविरोधात खोटी तक्रार केली असेल तर नात्यातील विश्वास संपलेला असतो, असे निरीक्षण नोंदवत खंडपीठाने कुटुंब न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

नाते टिकवायचे नव्हते

पत्नीने पती किंवा सासरच्यांविरोधात खोटी तक्रार करण्याचा विचार केला असल्यास तिला नाते टिकवायचे नव्हते. खोटय़ा तक्रारीने नात्यात कटुताच येते. वैवाहिक जीवनाच्या मूळ तत्त्वांवर घाला बसलेला असतो, असे परखड मत न्यायालयाने व्यक्त केले.

काय आहे प्रकारण

या जोडप्याचा 2006 मध्ये विवाह झाला. काही महिन्यांतच त्यांच्यात वाद सुरू झाला. घटस्पह्टासाठी अर्ज दाखल झाला. पतीची वागणूक सुधारावी म्हणून कौटुंबिक हिंसाचाराची खोटी तक्रार केल्याची कबुली पत्नीने कुटुंब न्यायालयात दिली. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने घटस्पह्ट मंजूर केला. खोटी तक्रार करण्याचे पत्नीचे वर्तन क्रुरताच आहे, असे कुटुंब न्यायालयाने स्पष्ट केले. त्याविरोधात पत्नीने दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;