घोडयांसोबत झोपला, त्यांची लीदही साफ केली; अजय देवगणच्या पुतण्याने चित्रपटासाठी काय काय केलं?

घोडयांसोबत झोपला, त्यांची लीदही साफ केली; अजय देवगणच्या पुतण्याने चित्रपटासाठी काय काय केलं?

भारती दुबे (टिव्ही 9 प्रतिनिधी)- बॉलिवूडमध्ये आता बऱ्यापौकी स्टारकिड्सची एन्ट्री होताना दिसत आहे, त्यातच आता रविना टंडनची लेक राशा आणि अजय देवगणचा पुतण्या अमनची एन्ट्री झाली आहे. या दोघांच्याही मुख्य भूमिका असलेला ‘आझाद’चित्रपच लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या या जोडीची प्रचंड चर्चा सुरु आहे.

अमन देवगण आणि रविना टंडनची मुलगी राशाची जोडी चर्चेत 

अभिनेता अजय देवगण याची प्रमुख भूमिका असणारा ‘आझाद’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटात त्याचाच पुतण्या अमन देवगण आणि रविना टंडनची मुलगी राशा यांची जोडी झळकणार आहे.

दरम्यान, नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. दोघांचीही भूमिका नेमकी कशी असणार आहे हे 17 जानेवारीला चित्रपट रिलीज झाल्यावर समोर येईलच.

घोड्यांसोबत अमन देवगणचे बरेच सीन्स

या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अमन आणि राशा अनेक मुलाखतींसाठी हजर राहत आहेत. मुलाखती दरम्यान अजय देवगणचा पुतण्या अमनने चित्रपटासाठी कशी तयारी केली याबद्दल सांगितलं आहे. चित्रपटात घोड्यांसोबत अमनचे बरेच सीन्स असल्याने त्याला फार तयारी करावी लागल्याचं त्याने सांगितले.

घोड्यांसोबत सीन्स देण्यासाठी अमनने काय मेहनत घेतली?

टिव्ही 9 हिंदी’ मीडियाशी संवाद साधताना अमनने सांगितले की, ” चित्रपटात माझे घोड्यांसोबत खूप सारे सीन्स आहेत. त्यासाठी मला स्वत:ला खूप तयारी करावी लागली. कार घोड्यांना कितीही प्रशिक्षण दिलं तरी देखील ते एक जनावर आहे. आपल्याला त्यांच्यापद्धतीनेच काम सांभाळून घ्यावं लागतं.कारण ते काही सेटवर येऊन आपल्यासारखे डायलॉग म्हणार नाहीत. घोड्यांसोबत सीन करण्यासाठी मी स्वत:ला तयार करत होतो. त्यासाठी मी त्यांच्यासोबत वेळ घालवायचो, त्यांच्या आसपासच झोपायचो, त्यांना त्यांचे खाद्यही द्यायचो, एवढंच नाही तर मी त्यांची पोट्टीही (लीद) साफ करायचो” असं म्हणत त्याने घोड्यांसोबत मैत्री करण्यासाठी काय काय केलं याबद्दल सांगितले.

“प्राण्यांशी मैत्री करणे मला फार आवडते”

अमन पुढे म्हणाला की,” घोड्यांशी मैत्री होणे फार महत्त्वाचे होते कारण त्यांना माझ्याकडून काही हानी नाही हा विश्वास त्यांनाही बसणं गरजेचं होतं. आणि तसेही प्राणी फार निरागस असतात, मलाही प्राणी फार आवडतात. त्यांच्याशी मैत्री करणे फार आवडते त्यामुळे माझ्यासाठी ते दिवस अतिशय सुंदर होते” असं सांगत अमितने चित्रपटातील प्रत्येक गोष्टीसाठी किती मेहनत घेतली याबदद्ल सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

चित्रपट 17 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित

दरम्यान चित्रपटाच्या ट्रेलरनंतर राशा आणि अमन या नवख्या जोडीला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. आता चित्रपट रिलीजनंतर ही जोडी आणि त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे.

राशा-अमन-अजय देवगण यांचा ‘आझाद’ हा चित्रपट 17 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;