रविना टंडनने लेकीला दिलेली भगवद्गीतेतील शिकवण; राशाचं श्रीकृष्णाबदद्लचं वक्तव्य, माय-लेकीच कौतुक

रविना टंडनने लेकीला दिलेली भगवद्गीतेतील शिकवण; राशाचं श्रीकृष्णाबदद्लचं वक्तव्य, माय-लेकीच कौतुक

अभिनेता अजय देवगण याची प्रमुख भूमिका असणारा ‘आझाद’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटात त्याचाच पुतण्या अमन देवगण आणि रविना टंडनची मुलगी राशा यांची जोडी झळकणार आहे. दरम्यान, नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. दोघांचीही भूमिका नेमकी कशी असणार आहे हे 17 जानेवारीला चित्रपट रिलीज झाल्यावर समोर येइलच.

रवीनाची लेक राशाने केलेलं वक्तव्य चर्चेत

या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अमन आणि राशा अनेक मुलाखतींसाठी हजर राहत आहेत. राशाच्या मुलाखतीमधली एक गोष्ट प्रचंड व्हायरल झालेली दिसत आहे. ती म्हणजे भगवद्गीतेचा संदर्भ देऊन रविनाने तिच्या लेकीला दिलेला एक मौल्यवान सल्ला. रवीनाची लेक राशाने केलेलं वक्तव्य सध्या सोशल मीडियावर फार चर्चेत आहे.

रविनाने लेकीला दिला भगवद्गीतेतील एक मौल्यवान सल्ला

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘टिव्ही 9 हिंदी’ मीडियाशी संवाद साधताना राशाने रविनाने तिला दिलेली एक शिकवण सांगितली. ती म्हणाली की,”माझ्या आईने मला एकदा सांगितलेलं. भगवद्गीतेत लिहिलंय की, तुम्ही फक्त खूप मेहनत करा. प्रत्येक कामात तुमचं बेस्ट द्या. पुढे जे काय होईल ते देवावर सोडा. तुमच्यासाठी जे बेस्ट आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. त्यासाठी कोणतीही गोष्ट धरून न ठेवता ती सोडून द्या. चांगले कर्म करत त्याचे चांगलेच फळ तुम्हाला मिळेल.” श्रीकृष्णाने जो सल्ला अर्जुनाला दिला तोच सल्ला कायम आईला लेकीला देत असल्याचं राशा म्हणाली.

“अतीविचार आणि अनिश्चितता खूप आहे”

एवढच नाही तर पुढे राशाने सांगितले की,” माझी आई म्हणते की, या इंडस्ट्रीत इमोशनल अटॅचमेंट खूप आहे. अतीविचार आणि अनिश्चितता खूप आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाचं ऐकत बसाल तर कायम चिंताग्रस्त राहाल. त्यामुळे तुम्ही तुमची खूप मेहनत करा, तुमचं बेस्ट द्या त्यानंतर देव सर्व काही नीट करेल हा विश्वास कायम ठेवा” असं म्हणतं तिने आईचा हा सल्ला कायम लक्षात ठेवून पुढे चालायचं ठरवल्याचं राशाने सांगितले आहे.

रविनाचे अन् तिच्या लेकीचे नेटकऱ्यांकडून कौतुक

दरम्यान, अजून एका मुलाखतीदरम्यान राशाने भगवद्गीतेचा उल्लेख गोष्टी सांगितल्या होत्या. राशाला भगवद्गीता, त्यातील विचार हे माहित आहे याबद्दल नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं होतं तसेच लेकीला दिलेल्या संस्काराबद्दल रविनाचेही नेटकऱ्यांनी कौतुक केले होते. राशा-अमन-अजय देवगण यांचा ‘आझाद’ हा चित्रपट 17 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं आहे.

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;