कोणत्या कंपनीचे नेटवर्क चांगले…, ट्रायच्या इंडिपेंडेंट ड्राइव्ह टेस्टचे निष्कर्ष जाहीर

कोणत्या कंपनीचे नेटवर्क चांगले…, ट्रायच्या इंडिपेंडेंट ड्राइव्ह टेस्टचे निष्कर्ष जाहीर

कोणत्या टेलिकॉम कंपन्यांचे नेटवर्क चांगले, यासंदर्भात ट्रायने नुकतीच इंडिपेंडेंट ड्राइव्ह टेस्ट (आयडीटी) घेतली. सप्टेंबर ते ऑक्टोबर 2024 दरम्यान नवी दिल्ली, जयपूर, अहिल्यानगर आणि हैदराबाद येथे ही चाचणी घेण्यात आली. त्या चाचणीने निष्कर्ष ट्रायने नुकतेच जाहीर केले.

बीएसएनएल/एमटीएनएल, रिलायन्स जिओ इन्पह्कॉम लिमिटेड  आणि व्होडाफोन आयडिया लिमिटेड या प्रमुख टेलिकॉम कंपन्यांवर ही चाचणी घेण्यात आली. चाचणीने व्हॉइस कॉल सेटअप यश दर, कॉल ड्रॉप दर, भाषण गुणवत्ता, डेटा थ्रुपुट आणि इतर कामगिरी निर्देशांकांचे मूल्यांकन केले.

नवी दिल्ली रिलायन्स जिओने कॉल सेटअप सक्सेस रेट 94 टक्के नोंदवला, तर एअरटेल, एमटीएनएल आणि व्होडाफोन- आयडियाने 97 टक्के पेक्षा जास्त दर नोंदविला. कॉल सेटअप वेळेत एमटीएनएलने 3.27 सेपंद घेतले, तर रिलायन्स जिओ आणि एअरटेलने अनुक्रमे 0.73 सेपंद आणि 0.82 सेपंद वेळ घेतला. कॉल ड्रॉप रेटमध्ये एमटीएनएलची कामगिरी खराब (7.23 टक्के) होती, तर रिलायन्स जिओ सह इतर कंपन्यांचे दर 0.25 टक्के पेक्षा कमी होता. रिलायन्स जिओने 231.82एमबीपीएसच्या सरासरी डाउनलोड स्पीडसह सर्वोत्तम कामगिरी केली, तर एअरटेलचा स्पीड 171.44 एमबीपीएस होता. एमटीएनएल, व्होडाफोन – आयडीयाचा वेग अनुक्रमे 3.71एमबीपीएस, 14.45 एमबीपीएस  होता.

हैदराबाद

रिलायन्स जिओ आणि एअरटेलसाठी कॉल ड्रॉप रेट शून्य इतका होता, तर बीएसएनएलचा दर 3.76 टक्के होता. रिलायन्स जिओने हैदराबादमध्ये 100 टक्के कॉल सेटअप सक्सेस रेट मिळवला, तर एअरटेल आणि बीएसएनएलचा दर 99.85 टक्के आणि 98.92 टक्के होता.

 जयपूर

रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडियाने 100 टक्के कॉल सेटअप यश दर नोंदविला, तर एअरटेल आणि बीएसएनएलने 99.90 टक्के आणि 98.92 टक्के यश दर मिळविला. बीएसएनएलसाठी कॉल ड्रॉपचा दर 2.48 टक्के होता, तर रिलायन्स जिओ आणि  व्होडाफोन आयडियासाठी  हा दर खूपच कमी होता. रिलायन्स जिओने  356.68 एमबीपीएसच्या सरासरी डाउनलोड स्पीडसह सर्वोत्तम कामगिरी केल़ी

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;