Beed: वाल्मीक कराडचा शस्त्र परवाना रद्द! जिल्हाधिकारी, पोलिसांना पश्चातबुद्धी

Beed: वाल्मीक कराडचा शस्त्र परवाना रद्द! जिल्हाधिकारी, पोलिसांना पश्चातबुद्धी

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्व आरोपींना ‘मकोका’ लावण्याचे धाडस तपास यंत्रणांनी केले, पण वाल्मीक कराडवर खंडणीचा फुटकळ गुन्हा दाखल करून त्याला पाठीशी घालण्यात आले. तोंडदेखली कारवाई म्हणून वाल्मीक कराडचा रात्र परवाना रद्द करण्यात आला असून, त्याबरोबर बीडच्या निष्क्रिय जिल्हाधिकाऱ्यांनी शंभर जणांना ‘तुमचा शस्त्र परवाना रद्द का करण्यात येऊ नये’ अशी नोटीस पाठवली आहे.

बीडमध्ये प्रसाद वाटण्यात यावा तसे शख परवाने वाटण्यात आले, कंबरेला बंदुका लावून गल्लीबोळात पोरंसोरं ‘रील’ बनवू लागली. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील शस्त्र परवान्यांचा विषय चर्चेत आला. सोशल मीडियावर बंदुका झळकावणाऱ्यांना चाप लावण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना जाग आली. अगोदर काही परवाने रद्द करण्यात आले.

काल संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना मकोका लावण्यात आला. मात्र वाल्मीक कराडवर फक्त खंडणीचा किरकोळ गुन्हा दाखवण्यात आला. वाल्मीक कराडच्या सरबराईत असलेल्या तपास यंत्रणांची त्याच्यावर कोणताही इतर गुन्हा दाखल करण्याची हिंमत झाली नाही. यावरून चोहोबाजूने टिकेची झोड उठताच आज जिल्हाधिकाऱ्यांनी लगबगीने शंभर जणांना ‘तुमचा शस्त्र परवाना रद्द का करण्यात येऊ नये’ अशी नोटीस पाठवली. या सर्वांना आपापली शस्त्रे जमा करण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे. परवाने निलंबित झाल्यानंतरही जर सोशल मीडियावर किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी शस्त्र सापडले तर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

>> वाल्मीक कराडसह शेकडो जणांचा शस्त्र परवाना रद्द करण्याचे धाडस जिल्हा प्रशासनाने दाखवले आहे. पण ‘आका’च्या इशारतीवर खिरापतीसारखे शख परवाने वाटून गब्बर झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई कधी होणार, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

>> ‘आका’च्या मेहरबानीने बीड जिल्ह्यात ठाण मांदल बसलेले पाठक जिल्हाधिकारी पदावर आसनस्थ झाले आहेत. याच अविनाश पाठक यांनी आज वाल्मीक कराडचा शस्त्र परवाना रद्द केला, वाल्मीक कराड सध्या सीआयडी कोठडीत आहे, त्यामुळे त्याच्यापर्यंत नोटीस पोहोचली नाही. मात्र कोठडीतून बाहेर आल्यावर बाल्मीकच्या हाती नोटीस ठेवण्यात येणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;