रुपी बँकेच्या एकरकमी कर्जफेड योजनेला सरकारची मंजुरी, सक्षम बँकेत विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू

रुपी बँकेच्या एकरकमी कर्जफेड योजनेला सरकारची मंजुरी, सक्षम बँकेत विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू

पुणे येथील रुपी को-ऑप. बँकेच्या विशेष एकरकमी कर्ज परतफेड योजनेस राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. येत्या 31 मार्चपर्यंत या योजनेस मुदतवाढ दिल्याने बँकेच्या कर्जाची वसुली झाल्यास बँक अन्य सक्षम बँकेत विलीनीकरणाचा मार्ग सुकर होणार आहे.

या बँकेच्या थकीत कर्ज आणि त्यावरील व्याजाच्या वसुलीसाठी बँकेने एकरकमी कर्जफेड योजनेसाठी सहकार आयुक्तांकडे मागणी केली होती. त्यानुसार सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाच्या आधारे शासनाने या बँकेस विशेष एकरकमी कर्ज परतफेड योजना मंजूर केली आहे.

यापूर्वी मे 2018 पर्यंत एकरकमी कर्जफेड योजनेस मुदतवाढ देण्यात आलेली होती. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने रुपी बँकेवरील निर्बंधास प्रत्येकवेळी ज्या कालावधीसाठी मुदतवाढ देईल त्या कालावधीपर्यंत रुपी बँकेच्या विशेष एकरकमी कर्ज परतफेड योजनेस मुदतवाढ देण्यात आलेली आहे. डिसेंबर 2023 अखेर बँकेत एकूण 1338 थकीत (एनपीए) कर्जखाती असून या खात्यामधून 271 कोटी 71 लाख मुद्दल व 1248 कोटी 19 लाख रुपये अशी एकूण रु. 1519 कोटी 90 लाख रुपये इतकी रक्कम येणे बाकी आहे. ही सर्व खाती अत्यंत जुनी असून बँकेचे अन्य सक्षम बँकेत विलीनीकरण होण्यासाठी या खात्यांवरील थकीत रकमा वसूल होणे आवश्यक आहे. थकीत कर्जाची वसुली झाल्यास बँकेचा संचित तोटा कमी होऊन बँकेस वाढीव तरलता निर्माण होईल. मात्र यासाठी बँकेने कर्ज खात्यावरील व्याजात काही सूट दिल्यास काही थकबाकीदारांनी या योजनेअंतर्गत कर्जखाती बंद करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे बँकेचे हित लक्षात घेऊन सदर योजनेमध्ये काही सुधारणेसह मुदतवाढ देण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीचा सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांनी दरमहा आढावा घेऊन रिझर्व्ह बँकेच्या अटींचे रुपी को-ऑप. बँकेकडून काटेकोरपणे पालन होत असल्याची खात्री करावी असेही या निर्णयात म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;