आजपासून कुंभपर्व… 40 कोटी भाविक येणार

आजपासून कुंभपर्व… 40 कोटी  भाविक येणार

उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभ क्षेत्राला 76वा अस्थायी जिल्हा बनवले आहे. 4 हजार हेक्टर क्षेत्रावर कुंभमेळा भरणार असून त्यासाठी जगभरातून तब्बल 40 कोटींहून अधिक श्रद्धाळू येण्याचा अंदाज आहे.

  • 56 ठाणी, फायर स्टेशन आणि तीन महिला ठाणी सज्ज ठेवली आहेत. 37 हजार पोलीस कर्मचारी, 14 हजार होमगार्डसह 50 हजारांहून अधिक सुरक्षा रक्षक तैनात.
  • कुंभमेळा 25 सेक्टर्समध्ये विभागला गेला असून घाटांची लांबी 12 किलोमीटर असणार आहे.

प्रयागराज या संगम तटावर उद्यापासून पुढचे 45 दिवस जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा रंगणार आहे. तब्बल 45 दिवस रोज लाखो मंत्र, जप आणि आहुती या कुंभपर्वाच्या निमित्ताने अनुभवता येणार आहेत. पौष पौर्णिमेपासून म्हणजेच 13 जानेवारीपासून सनातन आस्थेचे प्रतीक चारही शंकराचार्य, शैव-वैष्णव आणि सर्व आखाडय़ांचे महामंडलेश्वर, सर्व परंपरांचे जगद्गुरू, सिद्धयोगी आणि संत-महंत महाशिवरात्रीपर्यंत म्हणजेच 26 फेब्रुवारीपर्यंत संगमाच्या किनाऱ्यावर विराजमान असतील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;